पारनेर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

0

निरीक्षकांची प्रतिष्ठा पणालापारनेरमध्ये गावनिहाय निरीक्षकांची नियुक्ती

पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस आतापासून पूर्ण ताकदीनिशी उतरली असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी कार्यकर्त्यांची गावनिहाय निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे.

तालुक्यातील ज्या गावांमध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मानणारा समुदाय आहे, अशा कार्यकर्त्यांची प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी नेमणूक केलेली आहे. ग्रामपंचायत इच्छुकांनी तसेच गावातील कार्यकर्त्यांनी संबंधित निरीक्षकांशी संपर्क करावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आवाहनही करण्यात आले आहे.

पारनेर तालुक्यात विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर हा प्रयोग प्रथमच राबविण्यात येत आहे.
संबंधित गावे व नेमलेले निरीक्षक : पिंपळगाव तुर्क- दिलीपराव ठुबे, करंदी- गंगाराम बेलकर, विलास झावरे, पुणेवाडी – दीपक नाईक, दिलीपराव ठुबे. म्हस्केवाडी व चोंभूत- मधुकर उचाळे, बाळासाहेब पुंडे, सचिन साखला. कोहकडी- दादासाहेब पठारे, गंगाराम बेलकर , पाडळी कान्हूर व गोरेगाव- सुरेश धुरपते, सुरेश धुरपते, सिध्देश्वरवाडी, पळशी, व हत्तलखिंडी – प्रशांत गायकवाड, गुणोरे-बापूसाहेब भापकर, ढवळपुरी- बाळासाहेब माळी. वनकुटा- अरुणराव ठाणगे, बाळासाहेब माळी. भाळवणी- शंकर नगरे, सखाराम औटी. भोंद्रे- विलास झावरे, शिवाजी खिल्लारी, दत्तात्रय शेळके या प्रमुख नेत्यांची निवड करण्यात आली आहे.

यंदापासून ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांच्या चिन्हांना थारा नसल्याने कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या निवडणुकीतील जय-पराजयावरच तालुकास्तरीय राजकारण अवलंबून असणार आहे. गावकी-भावकीच्या राजकारणात मात्र राजकीय नेत्यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

निरीक्षकांची प्रतिष्ठा पणाला –
पारनेर तालुक्यातील 16 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांनी गावनिहाय पक्षनिरीक्षक नेमले आहेत. यात मात्र बाजार समितीचे सभापती, माजी सभापती, उपसभापती, बाजार समितीचे संचालक, सरपंचासह जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. गाव पातळीवरील या निवडणुकीत रणनीतीपासून ते जिंकण्यासाठी सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यांची भूमिका पुढील दृष्टीने लाख मोलाची ठरणार आहे.

 

LEAVE A REPLY

*