272 ग्रामपंचायतींची निवडणूक : प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 272 ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गावातील सत्ता आबाधित ठेवण्यासाठी तसेच विरोधकांकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वच पक्षांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे.
आक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीची तालुकानिहाय मोठ्या गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. आगडगाव, केंदळ खु, तिळापूर, सोनगाव, कोल्हार खु, ब्राह्मणगाव भांड, कोंेढवड, खडांबे खु, ताहाराबाद, मांजरी, कानडगाव, चिंचोली, निंभेरे, सडे, डिग्रस (राहुरी). जोर्वे, निळवंडे, निमगाव जाळी, निमोण, साकूर, घुलेवाडी, आश्‍वी बुद्रुक आणि खुर्द (संगमनेर). चास, चांदेकासारे, मोवीज, सोनेवाडी, सडे, शिंगणापूर, डाऊच खु, डाऊच बु, रांजणगाव देशमुख, भोजडे, कोळपेवाडी, जवळके, करंजी, खिर्डी गणेश, कुंभारी, ब्राह्मणगाव भांड, वारी, पोहेगाव (कोपरगाव).
सावळीविहीर, राजुरी, साकुरी, नांदूर्खी खु, नादुर्खी बु, निघोज, लोहगाव, राजंणखोल, आडगाव खु, निमगाव कोर्हाळे, कोर्हाळे, दहिगाव कोर्हाळे, दुर्गापूर, वाकडी, पिंपरी निर्मळ (राहाता). वांगी खु आणि बु, उंबरगाव, उंदीरगाव, भोकर, कमलापूर, दत्तनगर (श्रीरामपूर). माका, शिरेगाव, खुपटी, करजगाव, हिगोंणी, माळी चिंचोरे, हंडीनिमगाव, वडाळा बु, भेंडे खु, कांगोणी, सुरेश नगर, देडगाव,
पाणेगाव, पाचेगाव, रस्तापूर, कोठा (नेवासा). अमरापूर, वाघोली, खामगाव, रांजणी, सुलतानपूर, दहिगाव, शहरटाकळी, मुंगी, बालमटाकळी (शेवगाव). कोल्हार, तिसगाव, वाडेगव्हाण, मोहरी (पाथर्डी). आगडगाव, आठवड, बाबुडीबेंद, जखणगाव, कापूरवाडी, पांगरमल, नारायण डोह, नेप्ती, साकत, सारोळा बद्दी, सारोळा कासार, शेंडी, टाकळी खातगाव, वाळकी, निंबोडी, हिवरे झरे, हिंगणगाव(नगर). ढवळपुरी, वनकुटे, गोरेगाव (पारनरे). घोगरगाव, टाकळी लोणार, पेडगाव, विसापूर, काष्टी, बेलवंडी, (श्रीगांेंदा). कोपर्डी, निंबे, (कर्जत). रत्नापूर, कुंभेफळ, (जामखेड). या प्रमुख गावांसह 272 गावांचा समावेश आहे.

आक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय गावांची संख्या : संगमनेर-42, कोपरगाव-33, श्रीरामपूर-16, राहाता-20, राहुरी-17, नेवासा-21, अकोले-13 शेवगाव-20, पाथर्डी-11, जामखेड-3, कर्जत-9, श्रीगोंदा-18, पारनेर-17 आदी. अशा एकूण 272 ग्रामपंचायती आहेत. 

प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम
सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम : 3 ते 14 जुने गाव नकाशे प्राप्त करुन गुगल मॅपद्वारे स्थळ पाहणीसाठी ग्रामसेवक व तलाठी यांची नियुक्ती करून संबंधित तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना प्रभाग रचना तयार करून संयुक्त स्वाक्षरीने मान्यतेसाठी ठेवणे. 25 ते 30 जून – प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण ग्रामसभेपुढे ठेवून मान्यता घेणे. आवश्यक त्या सुधारणांसह जिल्हाधिकार्‍यांकडे मान्यतेसाठी पाठविणे. 1 ते 7 जुलै – हरकती व सूचना, 10 ते 17 जुलै -प्राप्त हरकतींवर प्रांताधिकारी सुनावणी घेणार, हरकती अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविणे.18 ते 24 जुलै – प्राप्त हरकतीवर जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार.25 ते 29 जुलै – अंतिम प्रभाग रचना व आरक्षित जागा प्रसिद्ध करणे आदी.

LEAVE A REPLY

*