जिल्हा नियोजन समिती निवडणूक : 26 जागांसाठी 37 जण रिंगणात

0

10 जागा बिनविरोध, भाजपा विरोधात सर्वपक्षीय मोट

निवडणुकीवरून काँग्रेस-भाजपाचे एकमेकांवर आरोप
गडाखांची दोन्ही काँग्रेसला साथ
बळानुसार कोट्याला भाजपाकडून विरोध : ससाणे
ऐनवेळी दोन्ही काँग्रेसने हात वर केले : वाकचौरे
संघटित निवडणुकीला सामोरे जावू : घुले
भाजपाकडून अधिक जागांची मागणी : गाडे
आमचेच उमेदवार विजयी होतील : प्रा. बेरड

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त असणार्‍या 36 जागांपैकी जिल्हा परिषदेच्या 10 जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, अखेरपर्यंत बिनविरोधसाठी प्रयत्न करूनही 26 जागांसाठी 37 उमदेवार निवडणूक रिंगणात राहिल्याने यंदा पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीसाठी मतदान होणार आहे.

नियोजन समितीची 22 ऑगस्ट रोजी निवडणूक होत आहे. सोमवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. दरम्यान जिल्हा परिषद (ग्रामीण निर्वाचन क्षेत्र) सर्वसाधारण मतदारसंघात 8 जागांसाठी 13 अर्ज दाखल होते. माघारीवेळी राहुल राजळे (पाथर्डी) व भाऊसाहेब कुटे (संगमनेर) या दोघांनी माघार घेतली. त्यामुळे आता 8 जागेसाठी सुधाकर दंडवते, राजेश परजणे (कोपरगाव), पुष्पा वराळ (पारनेर), गुलाब तनपुरे (कर्जत), माधवराव लामखडे, शरदराव झोडगे (नगर), हर्षदा काकडे (शेवगाव), प्रभावती ढाकणे (पाथर्डी), शरद नवले (श्रीरामपूर), जालिंदर वाकचौरे (अकोले), सीताराम राऊत (संगमनेर) आदी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या एकूण 9 जागांसाठी 13 अर्ज दाखल अर्ज होते. यात सुषमा दराडे (अकोले), मीरा शेटे (संगमनेर) ताराबाई पंदरकर (श्रीगोंदा) या तीन महिलांनी माघार घेतली.यामुळे विमल आगवन (कोपरगाव), आशाताई दिघे (श्रीरामपूर), रोहिणी निघुते, (संगमनेर), राजश्रीताई घुले (शेवगाव), सुप्रिया पाटील, उज्वला ठुबे, राणी लंके (पारनेर), सुनिता भांगरे (अकोले), अनुराधा नागवडे, पंचशिला गिरमकर (श्रीगोंदा) या 10 महिलांमध्ये निवडणूक होत आहे. केवळ एक अर्ज जादा राहिल्याने या ठिकाणी निवडणूक होणार आहे.

नागरिकांचा मागासप्रवर्ग पुरुष प्रवर्गाच्या एकूण 5 जागेसाठी 10 अर्ज दाखल होते. माघारी दरम्यान संदेश कार्ले (नगर), काशिनाथ दाते (पारनेर), अजय फटागंरे, मिलिंद कानवडे (संगमनेर) आदी चार सदस्यांनी माघार घेतली. त्यामुळे सुनिल गडाख (नेवासा), शिवाजी गाडे (राहुरी), दत्तात्रय काळे (नेवासा), रामहरी कोतोरे, प्रताप शेळके, आणि अनिल कराळे (पाथर्डी) या सहा सदस्यांमध्ये लढत होत आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गाप्रमाणे एक अर्ज जादा राहिल्याने बिनविरोधची संधी हुकली. जिल्हा परिषदेच्या उर्वरित एकूण 22 जागांसाठी 27 सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.

नगर परिषद/नगरपालिका (लहान निर्वाचन क्षेत्र)- सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या एका जागेसाठी 6 अर्ज दाखल होते. त्यापैकी- छाया गोरे (श्रीगोंदा), सुहासिनी गुंजाळ (संगमनेर) आदींनी माघार घेतली. त्यामुळे शारदा गिधाड (राहाता), उषाताई तनपुरे (राहुरी), संगिता मखरे, मंगल कोकाटे (शेवगाव) आदी 4 महिला नगरसेवक रिंगणात आहेत. त्यांच्यात रस्सीखेच आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी काँग्रेसच्याच दोन गटात लढत आहे. आ. भाऊसाहेब कांबळे यांचे चिरंजीव संतोष कांबळे आणि जिल्हाध्यक्ष जयंतराव ससाणे यांच्या गटाच्या चंद्रकला डोळस यांच्यातील सामना रंगणार आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवर्गाच्या 1 जागेसाठी चार अर्ज दाखल होते. माघारी दरम्यान, सोनाली शिंदे (संगमनेर), अनिता पोपळघट (राहुरी) या दोन महिलांनी माघार घेतली. स्नेहल खोरे (श्रीरामपूर) व डॉ.मंगल गाडेकर (राहाता) यांच्यात सरळ लढत होत आहे. नगर पंचायत सर्वसाधारण महिला एका जागेसाठी चार अर्ज दाखल होते. माघारी वेळी निर्मला सांगळे (नेवासा) व वृषाली पाटील (कर्जत) यांनी माघार घेतली.त्यामुळे सोनाली नाईकवाडी (अकोले), संगिता औटी (पारनेर) यांच्यात लढत होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून भानुदास पालवे काम पाहत आहेत.

………
झेडपीच्या 10 जागा बिनविरोध
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) विद्यमान अध्यक्षा शालिनीताई विखे, कविता लहारे (काँग्रेस) तेजश्री लंघे (राष्ट्रवादी), ललीता शिरसाठ व संध्या आठरे (भाजप) आदी.तर, अनुसूचित जाती प्रवर्गातून पुरूषांच्या दोन राखीव जागेसाठी भाजपाचे कांतीलाल घोडके आणि सोमीनाथ पाचरणे या सात जागा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच बिनविरोध झाल्या होत्या. अर्ज छाननी दरम्यान अनुसूचित जमाती संवर्गातील एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये सुनिता भांगरे यांच्या अर्ज अवैध ठरविल्याने कॉग्रेसचे दिनेश बर्डे बिनविरोध झाले. तर, सोमवारी माघारच्या शेवटच्या दिवशी अनुसूचित जाती महिला संवर्गातील 2 जागांसाठी एकूण 3 दाखल अर्जापैकी पैकी वंदना लोखंडे यांनी माघार घेतली. दरम्यान गडाखप्रणीत शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या सुरेखा साळवे व कोपरगावच्या सोनाली साबळे बिनविरोध झाल्या. झेडपीच्या 32 पैकी एकूण 10 जागा बिनविरोध झाल्याने आता 22 जागेसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा नियोजन समितीसाठी निवडणुक होण्यापूर्वीच भाजपला 4, काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादीला 2 व शेतकरी क्रांतिकारी पक्षाला एका ठिकाणी खाते खोलण्याची संधी मिळाली आहे.
…………
प्रवर्गनिहाय जागा व रिंगणातील उमेदवार
जिल्हा परिषद – नागरिकांचा मागास प्रवर्ग 5 जागा, 6 उमेदवार.
सर्वसाधारण पुरुष 8 जागा, 11 उमेदवार.
सर्वसाधारण महिला 9 जागा, 10 उमेदवार
नगरपंचायत – सर्वसाधारण महिला 1 जागा, 2 उमेदवार.
नगरपालिका – सर्वसाधारण महिला 1 जागा, 4 उमेदवार.
नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 जागा, 2 उमेदवार.
अनुसूचित जाती 1 जागा, 2 उमेदवार.
…………….
माघार घेतलेले उमेदवार
जिल्हा परिषद- सर्वसाधारण महिला प्रवर्ग- सुषमा दराडे (शिवसेना), ताराबाई पंधरकर (भाजप), मीरा शेटे (काँग्रेस).
ना.म. प्र- संदेश कार्ले, काशिनाथ दाते (शिवसेना), अजय फटांगरे, मिलिंद कानवडे (काँग्रेस).
सर्वसाधारण – राहुल राजळे (भाजप), भाऊसाहेब कुटे (काँग्रेस).
नगर पंचायत – सर्वसाधारण महिला- निर्मला सांगळे, वृषाली पाटील (भाजप).
नगर परिषद- सर्वसाधारण महिला- सुहासिनी गुंजाळ (काँग्रेस), छाया गोरे (भाजप).
ना. म. प्र. महिला – सोनाली शिंदे (काँग्रेस), अनिता पोपटघळ (जनसेवा आघाडी).

………………………….

अशी रंगणार लढत – 

नगर परिषद/नगरपालिका (लहान निर्वाचन क्षेत्र) –  सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या एका जागेसाठी शारदा गिधाड (राहाता), उषाताई तनपुरे (राहुरी), संगिता मखरे, मंगल कोकाटे (शेवगाव). नगर परिषद/नगरपालिका (लहान निर्वाचन क्षेत्र) –  सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या एका जागेसाठी शारदा गिधाड (राहाता), उषाताई तनपुरे (राहुरी), संगिता मखरे, मंगल कोकाटे (शेवगाव). अनुसूचित जाती प्रवर्ग एक जागा – संतोष कांबळे व चंद्रकला डोळस (श्रीरामपूर). नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवर्ग -स्नेहल खोरे (श्रीरामपूर) व डॉ.मंगल गाडेकर (राहाता). नगर पंचायत सर्वसाधारण महिला एक जागा – सोनाली नाईकवाडी (अकोले), संगिता औटी (पारनेर).

यांची बिनविरोध निवड – झेडपी अध्यक्षा शालिनीताई विखे, कविता लहारे (काँग्रेस) तेजश्री लंघे (राष्ट्रवादी), ललीता शिरसाठ, संध्या आठरे, कांतीलाल घोडके, सोमीनाथ पाचरणे(भाजप), दिनेश बर्डे(काँग्रेस),  सुरेखा साळवे (शेतकरी क्रांतिकारी पक्ष), सोनाली साबळे (राष्ट्रवादी).

LEAVE A REPLY

*