‘साई एम्लॉईज’वर विखे गटाची सत्ता

0

सत्ताधारी जगताप गटाचा दारूण पराभव

शिर्डी (प्रतिनिधी) – राज्यात नावलौकीक असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणूकीत डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील साई जनसेवा पॅनलने 11 पैकी 8 जागा जिंकुन संस्थेवर निर्वीवाद वर्चस्व मिळविले. तर सत्ताधारी गटाचे नेते राजेंद्र जगताप यांच्या पॅनलला खातेही उघडता आले नाही. विलास गोंदकर यांच्या साई विरभद्र पॅनलला तीन जागा मिळाल्या.

साई संस्थान कर्मचार्‍यांच्या साई एम्लॉईज क्रेडीट को ऑप सोसायटीची निवडणूक अटीतटीची झाली. 2018 सभासद संख्या असलेल्या या सांस्थेच्या निवडणूकीसाठी रिंगना साईजनसेवा, साईविरभद्र आणि साईहनुमान या तीन पॅनलमध्ये अटीतटीचा सामना झाला. यात युवा नेते डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली साईजनसेवा पॅनलचे यादवराव कोते, तुषार शेळके, प्रताप कोते, जितेंद्र गाढवे, श्रध्दा कोते यांनी नेतृत्व केले.

त्यांनी सत्ताधारी गटाचे नेते राजेंद्र जगताप यांच्या हनुमान पॅनलचा धव्वा उडवत 8 जागा मिळवत सत्ता काबीज केली. विलास गोंदकर यांच्या विरभद्र पॅनलने तीन जागांवर विजय मिळविला.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते- यादवराव माधव कोते(849), तुषार सुदाम शेळकेे(838), विलास पंढरीनाथ गोंदकरे(874), प्रताप संपतराव कोतेे(898), श्रध्दा विजय कोतेे(877), मिरा संजय कोटकर(829), दिपक भाऊसाहेब धुमसेे(804), विठ्ठल तुकाराम पवार (639), दिनेश दिलीप कानडे(846), जितेंद्र साहेबराव गाढवे(631), संदिप भाऊसाहेब बनसोडे 623) हे उमेदवार विजयी झाले.

LEAVE A REPLY

*