आज वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द होणार डिपीडीसी निवडणूक

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीच्या 36 जागांच्या पोटनिवडणूकीसाठी एकूण 75 दाखल अर्जाची छानणी पूर्ण झाली असून आज 7 सोमवार 7 ऑगस्ट रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणुक विभागाने दिली.

जिल्हा नियोजनसाठी 1 ते 4 ऑगस्ट उमेदवारी अर्ज सादर करण्याची मूदत होती.जिल्हा परिषद (ग्रामीण निर्वाचण क्षेत्र) एकूण 32 जागा आहेत.दरम्यान मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यत नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या एकूण 5 जागेसाठी 5 तर, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या दोन जागांसाठी दोनच अर्ज दाखल झाल्याने झेडपीच्या सात जागा 4 ऑगस्ट रोजी बिनविरोध झाल्या आहे. त्याची अधिकृत घोषणा 14 ऑगस्ट रोजी निवडणूक विभाग करणार आहे.

आता उर्वरीत 25 जागांसाठी निवडणूक होत आहे. तर, शनिवारी अर्ज छाननीत अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकूण 2 अर्जा पैकी एक अर्ज अवैध ठरला आहे. तर, सर्वसाधारणमध्ये एकूण दाखल 15 अर्जापैकी 2 अवैध ठरले आहे.तसेच लहान नागरि निर्वाचन क्षेत्रातील अनुसूचित प्रवर्गातील एका जागेसाठी चार दाखल अर्जापैकी तीन अवैध ठरल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, नगरपंचायतीच्या एका जागेसाठी दाखल 6 अर्जापैकी 2 अवैध ठरले आहे.दरम्यान अवैध ठरलेल्या अर्जावर संबधितांनी हरकत घेतल्यास काय निर्णय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

अपील करण्यासाठी 2 दिवसांची मूदत – आज सोमवार दि 7 ऑगस्ट रोजी अपर जिल्हाधिकारी प्राप्त एकूण अर्जापैकी वैध ठरलेल्या उमदेवारांची यादी जाहीर करणार आहे.दरम्यान नामनिर्देशन फेटाळल्यास अपिल करण्यासाठी दोन दिवसांची मूदत देण्यात आली आहे.सदर अपीलावर 10 ऑगस्टपर्यत निर्णय घेण्यात येणार आहे.दुसर्‍या दिवशी 11 ऑगस्ट रोजी अंतीम वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.14 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मूदत असून निवडणूक लढविणार्‍या उमदेवारांची 16 ऑगस्ट रोजी यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

LEAVE A REPLY

*