जिल्हा नियोजनासाठी सर्वच पक्षाकडून लॉबिंग

0
सर्वसाधारण प्रवर्गात 9 महिलांना संधी, राजकीय पक्षाची डोके दुखी वाढणार
अहमदनगर (प्रतिनधी) – जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवार उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटचा दिवस आहे.नियोजन समितीवर आपल्या पक्षाच्या अधिका अधिक सदस्याना संधी मिळावी.यासाठी सर्वच राजकीय पक्षानी फिल्डींग लावली आहे.सर्वसाधारण प्रवर्गातून 17 जागा असून त्यातही 9 जागा महिलांसाठी राखीव असल्याने खुल्या प्रवर्गातील पुरुष सदस्यांची कोंडी होणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पर्क्षांची डोकेदुखी वाढणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त असणार्‍या 36 जागांसाठी 22 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.

नियोजन समितीच्या रिक्त असणार्‍या 36 पैकी 32 जागा या जिल्हा परिषद मतदार संघातील आहेत. उर्वरित 3 जागा नगर पालिका आणि 1 जागा नगर पंचायत मतदार संघातील आहे. नियोजन समितीत खर्या अर्थाने जिल्हा परिषद सदस्यांना ठराव करण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी आमदार हे निमंत्रित सदस्य असतात. जिल्याचे पालकमंत्री पद भाजप कडे असून जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून सताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये संघर्ष झालेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीला महत्व आले आहे. नियोजन समितीवर आपल्याच पक्षाच्या जास्तीत जास्त सदस्यांना संधी मिळावी यासाठी सर्वच पक्षाकडून प्रयत्न सुरु आहे.

नियोजन समितीची निवडणूक बिन विरोध करायची झाल्यास जिल्हा परिषदेत पक्ष निहाय विद्यमान सदस्यांच्या सदस्य बलानुसार कोठा निश्चित करून त्या आधारे प्रत्येक पक्षातून या ठिकाणी सदस्यांची वर्णी लावता येऊ शकते. या साठी सर्व जिल्हा परिषद सदस्यांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल. मात्र यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्याकडून याला हिरवा कंदील मिळणे गरजेचे आहे.

सत्ताधारी काँग्रेसच्या सदस्यांची गेल्या आठवड्यात जिल्हा नियोजांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली आहे. यात पक्षाला किती जागा मिळू शकतात यावर प्राथमिक चर्चा झालेली आहे. उर्वरित सकाळी राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांची मते जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी जाणून घेतली असून त्यानुसार ते आज शुक्रवारी आपली सदस्यंची मते जाणून घेणार आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी आपल्या पक्षासाठी उमेदवारी अर्ज या पूर्वीच नेलेले आहेत.

नियोजन समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्राथमिक चर्चेत कॉग्रेसचे 10 सदस्य राष्ट्रवादी 8 भाजप 7 आणि सेना 4 अशा जागांची मागणी झालेली आहे. हि संख्या 29 होत असून नियोजन समितीच्या 32 जागा रिक्त आहेत. उर्वरित ठिकाणी अन्य पक्षाच्या सदस्यांना संधी देण्याची बोलणी सुरु आहे. यात खरी मेख अनुसूचित जमाती, जाती आणि ओ बी सी प्रवर्गाच्या जागा जो पक्ष जास्त घेईल त्याला सर्वाधिक जागा देण्यात यावी अशी चर्चा आहे.

सोमवारी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे यंदा नियोजन समितीसाठी मतदान होणार कि जि.प सदस्य एकत्र येत नियोजन समिती बिनविरोध करणार याकडे जिल्याचे लक्ष लागले आहे.

विद्यमान सदस्य सदस्यांमध्ये कॉग्रेस कडे 23, राष्ट्रवादीकडे 18, भाजप कडे 14 शिवसेना 7, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 5 महाआघाडी 2, कम्युनिस्ट 1 शेतकरी विकास आघाडी 1, जनशक्ती 1 असे सदस्य आहेत. या पैकी जिल्हा नियोजन समितीवर कोणाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*