डीपीडीसीसाठी पाच जणांची उमेदवारी, आज चित्र स्पष्ट होणार

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीच्या 36 जागांच्या निवडणुकीसाठी तिसर्‍या दिवशी 5 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले.तर, 190 अर्ज नेले आहे. आज 4 ऑगस्ट दुपारी 3 पर्यत अर्ज सादर करण्यासाठी अखेरची मुदत आहे.त्यामुळे अखेरच्या दिवशी 36 जागांसाठी किती अर्ज प्राप्त होतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.गुरुवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा कृषी विद्यापीठ राहुरी येथे होती.

त्यामुळे झेडपीचे गुरुवारी ग्रामीण निर्वाचन क्षेत्रसाठी केवळ 3 अर्ज दाखल झाले आहे. नगर परिषद (लहान नागरी निर्वाचन क्षेत्रासाठी) 2 अर्ज दाखल आहेत. नगर परिषद मतदारसंघातून श्रीरामपूर येथील स्नेहल केतन खोरे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) यांनी दोन अर्ज दाखले केले. तर, जिल्हा परिषद ग्रामीणमधून कोपरगाव तालुक्यातून तीन सदस्यांनी अर्ज दाखल केले.

यामध्ये सोनाली प्रसाद साबळे, (कोकमठाण,अनुसूचित जाती महिला प्रवर्ग), विमल कारभारी आगवण (सर्वसाधारण महिला), सुधाकर वामनराव दंडवते (कारवाडी, सर्वसाधारण प्रवर्ग) आदींनी अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे अर्ज दाखल केले आहेत.

LEAVE A REPLY

*