सायखिंडी सोसायटी निवडणूक ; शेतकरी विकास मंडळाचा विजय

0
तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या सायखिंडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाने मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय संपादन केला.
सायखिंडी सोसायटीच्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व गरुड कुक्कुटपालन संस्थेचे माजी अध्यक्ष भिमाजी बोर्‍हाडे, संचालक संजय गोर्डे, नवनाथ शिंदे, नामदेव पारधी, एकनाथ गांडोळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने 13 पैकी 13 जागांवर विजय संपादन केला. शेतकरी विकासचे विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. गणपत रामभाऊ शिंदे, अंबादास भिमाजी बोर्‍हाडे, किसन शिवराम जेडगुले, मंगेश मुरलीधर घोडेकर, प्रकाश अनाजी गुळवे, अशोक श्रीरंग गांडोळे, भाऊसाहेब बाबू शिंदे, भानुदास पुंजा शिंदे, अ‍ॅड. गणपत नरहरी गांडोळे, सखाराम चांगदेव पारधी, चहाबाई विठोबा गोर्डे, जिजाबाई राधाकिसन गांडोळे, गीताराम रामनाथ गुळवे (बिनविरोध) विजयी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. डी. शिंदे यांनी काम पाहिले. शेतकरी विकास मंडळाच्या विजयासाठी विश्‍वनाथ शिंदे, शिवनाथ बोर्‍हाडे, सरपंच मीराबाई नन्नवरे, शिवनाथ पारधी, सखाहरी गुळवे, नामदेव गुळवे, रघुनाथ खतोडे, गोविंद शिंदे, संदीप खतोडे, दिलीप नन्नवरे, सीताराम जेडगुले, रोहिदास गांडोळे, गंगाराम सायखिंडीकर, तुळशीराम गांडोळे, बाळू शिंदे, सुभाष शिंदे, शिवनाथ बोर्‍हाडे, जगन बोर्‍हाडे, संजय बोर्‍हाडे, बाळू जोंधळे, भीमा शिंदे, अनिल गोर्डे, भाऊराव गोर्डे, शशी गांडोळे, विलास गांडोळे, भारत गांडोळे, लक्ष्मण चारुडे, सुखदेव पारधी यांनी परिश्रम घेतले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.

 

LEAVE A REPLY

*