एकविरा चौकात रपकारपकी

0
नगर टाइम्स,

मुकुंदनगर, सावेडीतील तरुणांनी जुन्या वादाचे काढले उट्टे

अहमदनगर (प्रतिनिधी) – जुन्या वादाच्या कारणातून सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील एकविरा चौकात दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून तोफखाना पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. शनिवारी (दि.9) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

सोमनाथ उर्फ भावड्या गिते, अशोक गिते, विजय सानप, ऋषीकेश रविंद्र परदेशी, तुषार उमाकांत थोरव (सर्व रा. पाईपलाईन रोड) गौरव विनायक केरूळकर, गोविद कासार (सर्व रा. फकीरवाडा) अशी दोन्ही गटातील आरोपींची नावे आहेत. याशिवाय इतर 4 ते 5 जण अज्ञात आरोपी असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. थोरवे व त्यांचे मित्र हे शनिवारी 5 वाजेच्या सुमारास एकवीरा चौक येथे मावा घेण्यासाठी आले होते. तेथे पानटपरीवर उभे असणार्‍या सोमनाथ गिते यांनी थोरावे याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. आमच्याकडे खुन्नसने का पाहतो, तुम्ही जास्त माजले का ?, तुमचा कार्यक्रम करावाच लागेल, असे म्हणत गिते यांच्या साथीदारांनी थोरवेला मारहाण करण्यास सुरूवात केली.

विजय सानप याने सोबत आणलेल्या कुर्‍हाडीच्या सहाय्याने जबर मारहाण केली. थोरवे यांच्या सोबत आलेल्या मित्रास देखील मारहाण केल्याचे तुषार थोरावे यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दुसरी फिर्याद अशोक भानुदास गिते यांनी दिली आहे. शनिवारी सायंकाळी गिते व त्यांचे मित्र एकवीरा चौकांत थांबले होते. मागील भांडण्याच्या कारणावरून ऋषीकेश गिते, तुषार थोरवे व इतर जाणांनी दगडाच्या सहाय्याने मारहण करत ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*