Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

माझ्या संमतीने देवेंद्र प्रदेशाध्यक्ष झाले…त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती; एकनाथ खडसेंची जोरदार फटकेबाजी

Share

परळी | वार्ताहर

ज्या देवेंद्र फडणवीस यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड माझ्या संमतीने झाली होती. त्यांच्या काळात मला तिकीट नाकारण्यात आले. कारण विचारले तर अजून दिले नाही.  गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे म्हणत भाजप नेतृत्वावर एकनाथ खडसे यांनी प्रचंड रोष व्यक्त केला.

भाजपमधील नाराजांची एक प्रकारे मांदियाळीच आज परळीत बघायला मिळाली आहे. गोपीनाथ गडावर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते.

यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली.

खडसे म्हणाले,  शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख असणाऱ्या भाजपला गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन समाजाचा पक्ष अशी ओळख मिळवून दिली.  गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा जयंती कार्यक्रम #Live @गोपीनाथगढ

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा जयंती कार्यक्रम #Live #गोपीनाथगड

Posted by Pankaja Gopinath Munde on Wednesday, 11 December 2019

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!