Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; पक्षप्रतोदपदी सुनील प्रभू

Share

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी आज पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. आज मुंबईतील शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली, यावेळी या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वत: एकनाथ शिंदे यांचे नाव विधिमंडळ नेतेपदासाठी सुचवले. यानंतर पक्षातील इतर सदस्यांनी एकमताने आदित्य यांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.

तर पक्षाच्या प्रतोदपदी मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य ठाकरेंची देखील गटनेतेपदी निवड होऊ शकते अशा चर्चांना उधान आले होते, मात्र, आदित्य राजकारणात नवीन आहेत, त्यांना विधानसभेच्या कार्यपद्धतीची माहिती होऊ द्या यामुळे आदित्यवर मोठी जबाबदारी अजून देण्यात येणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

यानंतर आज स्वत: आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्यानंतर शिवसेना नेत्यांनी शिंदे यांच्या नावाला अनुमोदन दिले. शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांची शिवसेना भवनावर बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीसाठी शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीमध्येच एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शिवसेना प्रतोद म्हणून सुनिल प्रभू यांची देखील पुन्हा निवड करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!