Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘सबुरी’ ठेवायची की ‘श्रद्धा सबुरी’चा मंत्र तोडून मार्गक्रमण करायचं, साई ठरवेल

Share

एकनाथ खडसे : सहकुटुंब साईदर्शन

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – मी साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जपतो आहे. मात्र अजून किती दिवस सबुरी ठेवायची? का संपूर्ण जीवनच सबुरी ठेवून काढायचं? की हा श्रद्धा सबुरीचा मंत्र तोडून मार्गक्रमण करायचं? याबाबतचे संकेत मला साईबाबा देतील आणि त्यानुसार माझी राजकीय वाटचाल राहील, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिर्डीत साईदर्शनानंतर केले.

मला पक्षात कितीही त्रास झाला, कितीही अवहेलना झाली तरी मी पक्षातच राहणार. कारण माझी पक्षावर नितांत श्रद्धा आहे, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना खडसे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळाचा नेता म्हणून सर्वांची मान्यता आहे. फडणवीस हे सर्वात मोठ्या पक्ष्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे परिस्थितीनुसार निर्णय घेतात. त्यांचे निर्णय कधी योग्य, तर कधी चुकीचे ठरले असतील. काँग्रेस राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्याचा जनतेचा कौल आहे. शरद पवार यांनी स्वत: आम्ही विरोधात बसणार असे सांगितले आहे. त्यामुळे दिलेल्या शब्दाप्रमाणे शरद पवार विरोधी पक्षातच राहतील अशी अपेक्षाही एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.

भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता एकनाथ खडसे यांनी काल सहकुटुंब शिर्डीला येवून साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी रोहिणी खडसे, भाजपाचे सचिन तांबे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, भाजयुमोचे आकाश त्रिपाठी, असिफ शेख आदी उपस्थित होते.

पाठीत खंजीर खुपसणार्‍यांची नावे जीवन चरित्रात जाहीर करणार
आपल्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांची नावे आपण आपल्या जीवन चरित्रात जाहीर करणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचवल्या. भुखंड प्रकरणात मी साईबाबांच्या कृपाशिर्वादाने निर्दोष झालो असल्याचेही सांगण्यास ते विसरले नाही. मात्र त्या वेदना मरेपर्यंत सदैव मनात राहतील, असेही त्यांनी सांगितले.

भाजपचाच मुख्यमंत्री
राज्यात भाजप आणि सेना युतीमध्ये लढले असून भाजपला कमी जागा मिळाल्या. मात्र सत्ता काबीज करण्यासाठी महायुती सक्षम आहे. 14 दिवस जरी झाले असले तरी अजून तीन दिवस बाकी आहेत आणि राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असल्याचा दावा खडसे यांनी केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!