Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसेंनी घेतली तावडे, पंकजा यांची भेट

एकनाथ खडसेंनी घेतली तावडे, पंकजा यांची भेट

मुंबई – एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी बुधवारी विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंची बैठक झाली. त्यानंतर एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडे यांची त्यांच्या घरी जावून भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान माजी मंत्री, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमातून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त निमंत्रित करताना समर्थकांना मावळे शब्दाने हाक देत पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? असा मजकूर प्रसारित केला होता.

या पोस्टवरून सुरू झालेला भाजपातील राजकीय गोंधळ थांबायची चिन्हे दिसत नाही. पंकजांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गौप्यस्फोट केला. ओबीसी असल्यानेच पंकजा यांचं खच्चीकरण केलं जात असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. स्व. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षातून काढून टाकण्याचा ठरावही भाजपाने केला होता.

- Advertisement -

मात्र, त्याला विरोध केल्यानं तो ठराव फेटाळण्यात आला. तोच प्रकाश पंकजा मुंडे यांच्यासोबत केला जात आहे,असे शेंडगे म्हणाले होते. शेंडगे यांच्या आरोपानंतर भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंही पंकजा यांची भेट घेतली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या