Video : ‘एक मराठा लाख मराठा’ चित्रपटात छ. संभाजीराजे भोसलेंची भूमिका

0
गणेश शिंदे निर्मित आणि दिग्दर्शित एक मराठा लाख लाख मराठा या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

या सिनेमामुळे पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाचे वातावरण तयार झाल्याचे देखील बोलले जाते आहे. विशेष बाब म्हणजे सोशल मिडीयावर या सिनेमाची चर्चा अधिक होतांना दिसते आहे.

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले देखील एक मराठा लाख मराठा या सिनेमातून पहिल्यांदा सिनेमात दिसणार आहे.

छत्रपती संभाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या राज घराण्यातील १३ वे वंशज आहेत.

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी या सिनेमात अभिनय केल्याने हा चित्रपट अधिक वजनदार झाला आहे.  या चित्रपटात छत्रपतींचा शाही थाटदेखील या सिनेमातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

निर्माते, दिग्दर्शक गणेश शिंदे याबाबत सांगतात, छत्रपतींनी या सिनेमात काम करावे अशी माझी आधीपासूनची इच्छा होती. परंतु ते हो म्हणतील की, नाही याबाबत मी साशंक होतो. त्यांना भेटून जेव्हा मी सिनेमाचे कथानक ऐकवले तेव्हा त्यांनी तात्काळ त्यांनी होकार दिला.

 

संबंधित बातम्या

एक मराठा लाख मराठातून आर्चीचे आईबाबा चित्रपटसृष्टीत

LEAVE A REPLY

*