Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय

८२ वर्षीय भिकूआजी झाल्या नाशिकच्या सर्वात ज्येष्ठ ‘उपमहापौर’

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | दिनेश सोनवणे

समाजकारण असो वा राजकारण महत्वाकांक्षेला वय नसते असे म्हटले जाते. असेच काहीसे चित्र आज नाशिक महापालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत बघायला मिळाले. नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ मधून निवडून आलेल्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका भिकूबाई किसनराव बागुल यांची नाशिकच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे भिकूआजींचे वयवर्ष ८२ आहे. सुंदर आणि सुरक्षित नाशिककसाठी काम करावयाचे असल्याचे त्या सांगतात.

ताज्या बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळवण्यासाठी आमचे टेलेग्राम चॅनल सबस्क्राईब करा

भिकू आजींची उतारवयात उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर पंचक्रोशीत आजींची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.  भिकूबाई आजींचा जन्म ११ एप्रिल १९३७ साली जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडव येथे झाला. प्राथमिक शिक्षण त्यांचे मूळगावीच झाले.

तालुक्याच्या गावी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्या प्राथमिक शिक्षिका म्हणून काम पाहू लागल्या. भिकू आजी यांच्या परिवारात दोन बहिणी आणि एक भाऊ असे सदस्य होते.

यानंतर त्यांचा विवाह किसनराव बागुल यांच्याशी झाला. पती किसनराव बागुल हे देशसेवा करण्यासाठी लष्करात दाखल झाले. त्यांनी १८ वर्षे देशसेवा केली. याकाळात भिकूबाई यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत उत्तम संस्कार रुजवले.

१९७५ साली पती किसनराव बागुल यांचे निधन झाले. यानंतर वणी येथून त्या मुलांसोबत नाशिक येथे वास्तव्यास आल्या. याकाळात त्यांची परिस्थिती अतिशय हालाखीची होती, काबाड कष्ट करून त्यांनी मुलांना उत्तम शिक्षित केले.

त्यांना दोन मुली आणि चार मुलगे आहेत. त्यातील एका मुलाचे निधन झाले असल्याचे समजते. त्यांचा मोठा मुलगा एचएएल कंपनीत नोकरीला आहे. दुसरा मुलगा बेकरी व्यवसाय करतो. तिसरा मुलगा शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष, श्रमिक सेना संस्थापक तसेच सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल हे आहेत.

भिकूबाई आजींचे राजकारणात पहिले पाऊल १९९२ साली पडले. शिवसेनेकडून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा २००२ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी आपले नशीब आजमावले. यातही त्यांना यश आले. पाच वर्षांच्या काळात त्यांनी महिला आणि बालकल्याण अध्यक्षा म्हणूनदेखील कामकाज पहिले.

त्यानंतर २००७ साली त्यांचे सुपुत्र संजय बागुल यांनी याच मतदार संघातून तिकीट मिळवत ते याठिकाणी नगरसेवक झाले. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी बागुल घराण्याने शिवसेनेला राम राम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या सर्वात वयस्कर नगरसेविका म्हणून भिकूबाई बागुल यांनी बहुमान मिळवला.   त्यानंतर आज भिकूआजी नाशिकच्या सर्वात वयस्कर उपमहापौर म्हणून निवडून आल्या आहेत.


या वयात उपमहापौर म्हणून जबाबदारी कशी पेलणार? 

मला घरात एकट बसवत नाही. नियमित काही ना काही काम करायला आवडतं. मी तिसऱ्यांदा महापालिकेत नगरसेविका म्हणून काम बघत आहे. यामुळे सर्वांना सोबत घेऊन मी काम करेल. अनेकजन म्हणतात, वयामानामुळे जबाबदारी पेलवेल का? तेव्हा मी त्यांना सांगू इच्छिते की, मी कधीही थकणार नाही, मला काम करण्याची आवड आहे. प्रशासनाला सोबत घेऊन येणाऱ्या काळात नाशिककरांना जास्तीत जास्त सुंदर आणि सुरक्षित नाशिक देण्यासाठी प्रयत्न करेल.

भिकूबाई बागुल, नवनिर्वाचित उपमहापौर नाशिक.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!