नाशिक जिल्हा सीमेवर ८० हजार नागरीकांची तपासणी

नाशिक जिल्हा सीमेवर ८० हजार नागरीकांची तपासणी

नाशिक । प्रतिनिधी

लाँकड‍ाऊन नंतर  परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी २२ मार्चपासून जिल्ह्यात २७ ठिकाणी चेकपोस्ट कार्यरत आल्या आहेत. आतापर्यंत या पथकामार्फत एकुण ३१ हजार ९३ वाहनांमधील ८० हजार ५६१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. अनेक सिमार्ती भागात त्यांच्या आश्रयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सदर तपासणी दरम्यान सिन्नर (३८ प्रवासी), निफाड (१५ प्रवासी), नाशिक (२ प्रवासी) देवळा (१ प्रवासी), बागलाण (९ प्रवासी), येवला (१४ प्रवासी), इगतपुरी (८ प्रवासी) असे एकुण ८७ प्रवासी वा नागरीकांना गृह विलगीकरण करण्याबद्दलचे स्टॅम्पिंग करणेत आलेले आहे.

तसेच संबंधित तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी यांना कळविणेत आलेले आहे. याशिवाय शहरातही सर्वच प्रमुख रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली असून, वाहनांची तपासणी करण्यात येते.

संपूर्ण देशात लागू असलेल्या लॉकडाउनबाबत १४ एप्रिलनंतर काय होणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे. करोनाची लागण नसलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन सुरू ठेवण्याच्या निर्णयाबाबत सध्या खलबते सुरू आहेत.

विशेषत: १४ एप्रिलनंतर एका जिल्ह्यातील नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात पोहचणार नाही, याची काळजी घेण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्याच्या सीमा भागात कार्यरत पथकांची जबाबदारी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com