Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वडाळीभोई : मालेगाव तालुक्यातील उसतोड कामगारांच्या वाहनाला अपघात; १८ जखमी

Share

नाशिक | प्रतिनिधी

उसतोडीसाठी जात असलेल्या कामगारांच्या वाहनाला अपघात होऊन १८ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना  घडल्याची माहिती मिळाली आहे. चांदवड तालुक्यातील वडाळीभोई  गावाजवळ सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातातील जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर दोन ते तीन गंभीर असलेल्या रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, मालेगाव तालुक्यातील मानके गावातील कामगार उसतोडीसाठी हिंगणवेढा येथे निघाले होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास गाडीने सोग्रस सोडून वडाळीभोईकडे प्रयाण केले.

दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावरील वडाळीभोई येथील पेट्रोल पंपासमोर चारचाकी वाहन उलटले.  या घटनेत १८ कामगार जखमी झाले  तर दोन ते तीन मजूर गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गंभीर जखमी असलेल्या दोन ते तीन मजुरांना नाशिकला हलविण्यात आल्याचे समजते. तर अन्य जखमींवर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  अद्याप जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!