Type to search

भोसला महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांची भारतीय भूदलात निवड

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमधील भोसला सैनिकी महाविद्यालयातील एनसीसी विभागातील आठ विद्यार्थ्यांची भारतीय भूदलात निवड झाली. यामध्ये रोहित खंदारे, रवींद्र जाधव, सुमित वाघ, नागेश काजळे, फकीरा चारोस्कर, प्रशांत मेटे, अभिषेक तिवारी व गौरव ढोकणे यांचा समावेश आहे.

या विद्यार्थ्यांचे याप्रसंगी सैनिकी सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. वाय कुलकर्णी तसेच एनसीसीचे ७ महाराष्ट्रा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल कुशवाहा व लेफ्टनंट कर्नल ए. के. सिंग यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या हातून उत्तम देशसेवा व्हावी यासाठी मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट योगेश भदाणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

error: Content is protected !!