फुगा तोंडात गेल्याने आठ महिन्यांचा बालकाचा मृत्यू

0

नवीन नाशिक ता. (प्रतिनिधी)  १० : लहान मुलांना फुगा खेळायला देणे किती गंभीर ठरू शकते याचा प्रत्यय नवीन नाशिकमधील आजच्या दुर्घटनेतून आला आहे.

फुग्याशी खेळताना तो फुटून त्याचा तुकडा बाळाच्या तोंडात गेल्याने त्याचा मृत्यू झाला. नवीन नाशिक येथील हनुमान चौकात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

वीर विनोद जयस्वाल (वय ८ महिने) असे दगावलेल्या बाळाचे नाव आहे.

बाळाला खेळण्यासाठी फुगा दिला होता. त्याने बालसुलभ वृत्तीने तोंडात घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याच वेळी फुगा फुटल्याने फुग्याचा तुकडा बाळाच्या घशात अडकला व श्वास रोखला गेल्याने बाळ दगावले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दात येण्याच्या काळात लहान बालकांची वस्तू तोंडात घालण्याची वृत्ती असते. मात्र त्याला खेळणे देताना ते सुरक्षित असेल का याची काळजी घ्यायला हवी.

बाजारातील Chocking Hazards  अशा नावाने अनेक खेळण्यांवर तीन वर्षांच्या आतील बालकांसाठी धोकादायक असा इशारा छापलेला असतो.

तो पाहूनच संबंधित खेळणी बालकांना द्यावी असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

*