Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर भीषण अपघात; आठ ठार, मालेगाव तालुक्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत

Share
महाराष्ट्र-गुजरात सीमेवर भीषण अपघात; आठ ठार, मालेगाव तालुक्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत, eight dies in an accident on maharashtra gujrat border breaking news

pc : Social Media

नाशिक | प्रतिनिधी 

महाराष्ट्र गुजरात सीमेवर झालेल्या तिहेरी भीषण अपघातात आठ जण ठार झाले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील व मालेगाव तालुक्यातील चौघांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सोनगड तालुक्यातील पोखरण गावात गुजरात परिवहन विभागाची बस, क्रुझर आणि टँकर असा तिहेरी अपघात आज सायंकाळी झाला.

विरुद्ध दिशेने भरधाव येणारे टँकर बसला समोरून धडकले. तर पाठीमागून येणाऱ्या क्रुझरचे नियंत्रण सुटल्याने ते देखील बसला पाठीमागून धडकले. या भीषण अपघातात स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार12 प्रवाशांचा मृत्यू तर 22 प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

नागपूर सुरत महामार्गावरील गुजरात राज्याच्या हद्दीत सोनगड नजीक टँकर विरुद्ध दिशेने येत होता. याच वेळी कुशलगठ-सुरत-उकई बसला समोरून टँकरने धडक दिली.

यानंतर भरधाव वेगात असलेली प्रवाशी क्रुझर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. क्रुझरदेखील बसवर मागून जाऊन धडकले. अपघातात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातात क्रुझर गाडीत सर्व प्रवासी मालेगाव जिल्हा नाशिक येथील होते, यातील एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!