सुरगाण्यात ईद-ए-मिलाद निमित्त जुलूस

0
सुरगाणा | इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर हजरत मोहम्मद स यांच्या जयंतीनिमित्त सुरगाण्यात जूलूस काढण्यात आला. सकाळी 10 वाजता सुन्नी जामा मशीद येथुन जुलुसची सुरुवात झाली.

सुरगाणा शहरातील व परिसरातील मुस्लिम बांधव यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जूलुस मार्गावर झेंडे व रंगीबेरंगी पताका लावण्यात आल्या होत्या.

तसेच सुरगाणा पोस्ट ऑफिसजवळील सुन्नी जामा मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जुलुसची मिरवणूक मेनरोड, झेंडा चौक, तैल्ली गल्ली मिरवणूकीची सांगता माणी रस्त्यावरीला यबारा बंगला येथे सय्यद जलाल शाहा बाबा, व जमाल शाहा बाबा दग्याजवळ झाली येथे प्रार्थना करण्यात येऊन सर्वासाठी दुवाँ मागण्यात आली.

याप्रसंगी सुरगाणा नंगरपंचायत नगरसेवक अकिल पठाण, नगरसेवक राजुबाबा शेख, भिकाशेठ पठाण,अहमद सैय्यद, रफिक मनियार, हाजी मुस्ताक पठाण, शब्बीर काजी, फीरोज शेख, शकील पठाण, अनिस पठाण, आबु मोलाना, आझाद शेख, एजाज शेख, इम्रान शेख, वसिम शेख,

शकुर शाहा, मेमुद शाहा, अन्नवर शाहा, जावेद काजी, मोसिन काजी, जावेद मनियार, शादाब मनियार, सलमान मनियार, अरिफ सैय्यद, ईनुस पठाण, फिरोज पठाण, मतिन पठाण, अलताफ शेख, सलमान शाहा, न ईम शाहा, सकलेन शेख, सत्तार भाई रईस शेख, जाविद फिटर यांच्यासह असंख्य मुस्लिम बाधंव उपस्थित होते. पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*