जिल्हाभरात पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणुका

0
श्रीरामपुरात सय्यद बाबा चौकातून मिरवणुकीला प्रारंभ
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांचा जन्मदिन ईद ए मिलादूनबी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमिताने काल शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात सुमारे पाच हजार मुस्लीम बांधव त्यात सामील झाले होते.
सकाळी सय्यद बाबा चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मौलाना आजाद चौक, गुलशन चौक, मिल्लत नगर, फातेमा कॉलनी, काजीबाबा रोठ, पापाभाई जलाल रोड, जमातखाना मार्गे मिरवणुकीची जामा मशिदीत सांगता झाली. मिरवणुकीत अग्रभागी मौलाना मोहमद ईमदादअली व ईतर मौलवी गण रथात विराजमान होते. डीजेवर नाअत पठण सुरू होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महाप्रसाद रूपाने मिठाई व विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.
मिरवणुकीत आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, ज्येष्ठ नेते जलीलखान पठाण, युवा नेते अविनाश आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, नगरसेवक अंजूमभाई शेख, मुजफ्फरभाई शेख, मुख्तारभाई शाह, सिद्धार्थ मुरकुटे, कलीम कुरेशी, प्रकाश ढोकणे, मुन्ना पठाण, रज्जाक पठाण, रियाज पठाण, महेंद्र त्रिभुवन, लकी सेठी, राजू दारुवाला, शकूर शेख, साजीद मिझा, डॉ राज शेख, मुख्तार खान सामील झाले होते. दावते इस्लामी या संघटनेने मिरवणुकीत विविध प्रतिकृती व देखावे सादर केले. गेले बारा दिवस विविध मशिदीतून झालेल्या मजलीस ए सिरतुन्नबी ची काल सांगता झाली तर सोमवारी कुरेशी जमात खाना येथे हजरत पैगंबरांच्या जीवनावर मुफ्ती मोहमद रिजवान यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
मिरवणूक व विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जामा मशीद ट्रस्ट, दावते इस्लामी, सुलताने हिन्द फाउंडेशन, यंग आझाद ग्रुप, अल फतेह सोशल ग्रुप, नुरे इलाही ग्रुप व विविध संघटनांच्या स्वयंसेवकानी प्रयत्न केले. पैगंबर जयंतीनिमिताने अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपअधीक्षक अरुण जगताप, पो. नि. वसंत पथवे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

मुस्लीम सण हे चंद्रदर्शनाच्या तिथीनुसार होतात. ईद ए मिलाद शनिवारीला असताना राज्य शासनाने शुक्रवारी सुटी जाहीर केली होती. मात्र त्यात बदल न केल्याने शुक्रवारी पैगंबर जयंती नसताना सुटी देण्यात आली. या बद्दल मुस्लीम समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येऊन शासनाच्या या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

कोल्हार (वार्ताहर) – कोल्हार भगवतीपूर येथे हजरत पैगंबर जयंती तथा ईद ए मिलादूनबी निमित्त सकाळी गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. मिरवुूकीत खीर वाटपाचा कार्यक्रम पार पडला. येथील जामा मशिदीमध्ये मौलानांचे प्रवचन झाले.
पैगंबर जयंतीनिमित्ताने संपूर्ण सप्ताहभर रात्री मशिदीध्ये धर्मगुरुंचे प्रवचन आयोजीत करण्यात आले होते. शनिवारी सकाळी कोल्हार भगवतीपूर येथील मशिदीपासून गावातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अश्‍वारूढ रथामध्ये मौलाना हाजी कौसर इसुउद्दीन सय्यद व मौलाना हाजी मुजीबउल्ला कादरी सय्यद विराजमान होते. कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे, उपसरपंच स्वप्निल निबे, देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी खर्डे, जि. प. सदस्य दिनेश बर्डे, पं. स. सदस्य भरत अंत्रे, शकीलभाई शेख, पंढरीनाथ खर्डे, बब्बा शेख, रईस शेख, जुल्फीकार शेख, मुन्ना शेख, वसंतराव मोरे, शाम गोसावी आदींनी मिरवणूकीचे स्वागत केले.

पारनेर (प्रतिनिधी) – मुस्लीम बांधवांच्यावतीने प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाददुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांच्यावतीने शहरातून मिरवणूक काढली होती. तसेच शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सवरधर्म समभाव, सामाजीक ऐक्य व अंधश्रद्धा या विषयावर समाजसेवक डॉ. आर. जी. सय्यद यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य जासुद, उपप्राचार्य कुसकर, डॉ. मुदस्सर सय्यद, डॉ. सादीक राजे, मौलाना महमंद नियाज, फिरोज राजे, निसार आतार, अकिल सय्यद, बबन शेख, आय्याज राजे, दानीश तसेच शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.  शहरातून काढलेल्या मिरवणूकीला राजे मस्जिद पासून प्रारंभ करण्यात आला. मिरवणूक लालचौक, शिवाजी रोड, सुतारगल्ली मार्गे आनंद लॉन मध्ये आली. यावेळी डॉ. आर. जी. सय्यद यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी माहीती सांगीतली.

 

 

 

LEAVE A REPLY

*