सर्व शिक्षासाठी 199 कोटींचा आराखडा प्रस्तावित

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या माध्यामातून सुरू असलेल्या सर्व शिक्षा अभियानात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने 199 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून तो केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठवला आहे. जून महिन्यांत साधारण या आरखड्याला मंजूरी मिळणार असून यात केंद्र किती मंजूर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरवर्षी साधारण जानेवारी महिन्यांत राज्यातील सर्व जिल्हा परिषदा सर्व शिक्षा अभियानाचा आराखडा प्रस्तावित करून मुंबईला शिक्षण परिषदेकडे पाठवत असतात. त्या ठिकाणी राज्यातील सर्व जिल्ह्यातील आराखडे एकत्रित करून ते मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येतात.
साधारण शाळा सुरू होण्याच्या कालावधीत केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून येणार्‍या आराखडा अभ्यास करून त्यांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम ठरवून सर्व शिक्षा अभियानाचा आराखडा तयार करून निधी वितरीत करत असते.
गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 255 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून केंद्र सरकारला पाठवला होता. केंद्र सरकारने तब्बल 100 कोटींची कात्री लावलत अवघ्या 144 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजूरी दिली होती. यंदाही शिक्षण विभागाने 199 कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित केला असून त्यात कधी मिळणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

अशा आहेत ठळक तरतुदी
मोफत पाठ्य पुस्तके 10 कोटी 43 लाख, मोफत गणवेश 9 कोटी 93 लाख, विविध प्रशिक्षण 5 कोटी 80 लाख, बांधकामे 19 कोटी 3 लाख, अंपग समावेश शिक्षण 3 कोटी 16 लाख, शिक्षक अनुदान 94 लाख, शाळा अनुदान 3 कोटी 12 लाख यांचा आदीसह अन्य कामासाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

*