शिक्षणमंत्र्यांनी सोडवला महाविद्यालय प्रवेशाचा प्रश्न; आयडीया कॉलेज आणि कौन्सिल ऑफ आर्किटेक्टच्या वादावर पडदा

0
नाशिक । नाशिकमधील आयडिया कॉलेजला गेल्यावर्षी कौन्सिल ऑफ आर्किटेक्ट यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि सरकार दरबारी संबंधितांच्या कामाच्या दिरंगाईमुळे अनेक अडचणीना सामोरे जावे लागले. अखेर सदरचे प्रकरण राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे गेले असता त्यांनी याविषयी तातडीने दखल घेवून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मार्गी लावला.

विद्यावर्धन ट्रस्ट यांच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हारमेन्ट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर अर्थात आयडिया कॉलेज नाशिकमध्ये कार्यरत आहे. महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा अंतर्गत विविध कोर्सेस चालवले जात होते. मात्र 2016 साली केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशातील मुक्त विद्यापीठे कुठलाही तांत्रिक शिक्षण असलेले कोर्सेस चालवू शकत नाही असा निर्णय जाहीर केला.

त्यानंतर आयडीया कॉलेजने या निर्णयाबाबत राज्य सरकारची संवाद साधला असता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (बाटू) शी संलग्न होता येईल असे सुचविले. त्यानंतर सर्व कागदपत्रे दाखल केल्यानंतर कॉलेजने बाटूकडे परवानगी मागितली. त्यावेळी बाटू विद्यापीठाकडून कौन्सिल ऑफ आर्किटेक्टची नाहरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मग कॉलेजने त्यासाठी तयारी सुरु केली.

सदरचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी विद्यापीठाकडून तपासणीसाठी एक पथक येऊन पाहणी करून गेल्यानंतरच प्रमाणपत्र मिळते. यासाठी कॉलेजने जानेवारी महिन्यामध्येच सर्व बाबीची पूर्तता गेली होती. मात्र जून महिना उजाडल्यानंतर ही कोणीच पाहणीसाठी आले नाही.

अखेर कॉलेजने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर तपासणी पथक येऊन पाहणी केली. मात्र कोणतेही कारण स्पष्ट दाखवले नाही आणि कॉलेजची विद्यार्थी क्षमता थेट शून्य केली. या प्रकारानंतर कॉलेजला विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी न्यायालायात दाद मागणे क्रमप्राप्त होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत कौन्सिल ऑफ आर्किटेक्टला न्यायालयाने कामकाजामध्ये सुधारणा करण्याचे आदेशही दिले. मात्र तरीही सरकार दरबारी दिरंगाई कायम होती. त्यामुळे अखेर कॉलेजने शिक्षणमंत्री विनोद तावडे याच्याकडे धाव घेतली. शिक्षणमंत्र्यानी मात्र अवघ्या काही तासात प्रश्न सोडवला. सोबतच कामामध्ये दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍याना खडे बोल सुनावले. आता सरकारकडून अध्यादेश काढण्यात येऊन विद्यार्थ्याचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.

शिक्षणमंत्रयांमुळे प्रश्न मार्गी : अनेकदा सरकार दरबारी कामे होत नाहीत असाच बहुतांश लोकांचा अनुभव असतो. आम्हाला मात्र सरकार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून मोलाचे सहकार्य मिळाले. अवघ्या काही तासात त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा केला.
विजय सोहनी, संचालक आयडीया कॉलेज, नाशिक

LEAVE A REPLY

*