नाशकात होणार जीवनगौरवचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन

0

नाशिक | प्रतिनिधी

जीवन गौरव शैक्षणिक मासिक व रामशेज शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन नाशकात येत्या जून महिन्यात होणार आहे.

खास पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गतवर्षीप्रमाणेच ५ जून रोजी साहित्य संमेलन पार पडणार आहे. यासाठी राज्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

शिक्षक आणि शिक्षिकांच्या कलागुणांना वाव मिळावा, शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक भावना वाढीस लागावी व त्यांना स्फूर्ती व प्रेरणा मिळावी यासाठी जीवन गौरव मासिकाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतो.

प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांना याप्रसंगी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यापूर्वी पहिले शिक्षक साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड, पुणे येथे ज्येष्ठ साहित्यिक कवीवर्य राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते.

यावर्षीच्या संमेलनात वाचकांना व रसिकांना ग्रंथदिंडी, उदघाटन, परिसंवाद, चर्चासत्र,निमंत्रितांचे कविसंमेलन व समारोप आदी कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे.

यासंदर्भातील बैठक नुकतीच जीवन गौरवचे संपादक रामदास वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी मीरा वाघमारे,  दिगंबर शिंदे, प्रा. डॉ. सतीश मस्के, दिनेश वाडेकर, संतोष दातीर, हरिदास कोष्टी यांच्यासह यावर्षीच्या प्रमुख आयोजक रूपाली बोडके आणि वैशाली भामरे यांच्या उपस्थिती पार पडली. यावेळी आयोजकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

*