पायाभूत मूल्यमापनाचे कामकाज गोपनीय ठेवा ; अन्यथा कारवाई होणार : मगर

0
गणोरे (वार्ताहर) – सावधान.. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमा अंतर्गत होऊ घातलेल्या पायाभूत मूल्यमापनाचे कामकाज गोपनीय ठेवा अन्यथा कारवाईला सामोरे जा अशा सूचना राज्याच्या विद्या प्राधिकरणाचे संचालक सुनिल मगर यांनी दिल्या आहेत. त्यामुळे अनेकाचे धाबे दणाणले आहे. शिक्षकांना मोबाईल काळजीपूर्वकच वापरावा लागणार आहे.तर व्हॉटसअप, फेसबूक सारख्या माध्यमांतून मूल्यमापाना बाबतची कोणताही माहीती प्रसारीत करता येणार नाही.
राज्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासाकरीता सुरू केलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमा अंतर्गत विद्या प्राधिकरणाकडून राज्य स्तरावरून प्रश्नपत्रिका पाठविण्यात येतात. त्या करीता असलेल्या लेखी परीक्षा, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा या संदर्भाने माहितीपुस्तका देखील पुरविण्यात येते. सामाजिक माध्यमातून मागील वर्षी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. अनेक ठिकाणी झेरॉक्स करणे, पीडीएफ फाईल तयार करणे व त्या विविध व्हॉटसअप समूहावर परीक्षा होण्यापूर्वी फिरणे असे काही प्रकार घडल्याचे माध्यमातून छापण्यात आले होते. या वर्षी अशा पध्दतीने कोणी परीक्षेचे पेपर, शिक्षकांसाठी इयत्तानिहाय तयार करण्यात आलेली माहिती पुस्तक संदर्भातील साहित्याची फोटोकॉपी व्हॉटसअप समूहात टाकणार्‍या संबधितावर कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.
राज्यात पायाभूत चाचणीचे वेळापत्रकात विद्याप्राधिकरणाने बदल केला आहे. पूर्वी 18 व 19 ऑगस्टला होणारे मूल्यमापनाच्या दिनांकात बदल करीत 16 तारखेला भाषा, 18 तारखेला गणित व 21 तारखेला इंग्रजी व 23 ऑगस्टला विज्ञान विषयाचे पेपर होणार आहे. इयत्ता दुसरी ते नववी दरम्यानच्या सर्व वर्गाचे पेपर निर्धारीत केलेल्या दिनांकासघेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदरच्या काळात राज्यातील शिक्षण विभागातील सर्व शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय अधिकारी शाळांवरती जाऊन मूल्यमापन करणार आहे. सदरचे मूल्यमापन संबधित अधिकार्‍यांच्या नावावर ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे पायाभूतच्या बाबतीत शासनाने गांभीर्यांने दखल घेतली असल्याची बाब या निमित्ताने समोर आली आहे.
  •   पायाभूतचे मूल्यमापन पेपर अथवा माहितीपुस्तका सामाजीक माध्यमात टाकल्यास कारवाईचे संकेत
  • तक्रार आल्यास शिक्षणाधिकारी करणार कारवाई 
  • पायाभूत चाचणी 16 ऑगस्ट पासून 23 पर्यंत राज्यात एकाचवेळी होणार 
  • इयत्ता दुसरी ते नववीचे विद्यार्थी जाणार सामोरे
  • सर्व माध्यमांच्या शाळांचा असणार समावेश.
प्रश्नपत्रिका वितरण सुरू – काटमोरे
राज्याने निर्धारीत केलेल्या तारखांना मूल्यमापन होण्यासाठी विद्या परिषदेच्या वतींने पुरविण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका जिल्हयास प्राप्त झाल्या आहेत. सदरच्या प्रश्नपत्रिका तालुका निहाय वितरण पूर्णत्वाला गेले असून सर्व माध्यमाच्या शाळांना विद्यार्थी संख्येएवढया माध्यम निहाय प्रश्नपत्रिका वितरण करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळांना त्या प्रश्नपत्रिका पुरविण्याचे आदेश देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*