
समाज माध्यमांवर एक आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यामधील संवादाची एक ध्वनीफित फिरत आहे. क्लिपमधील संवाद मोठा मजेशीर आहे. परिस्थिती सधन असूनही कोणीही मुलगी द्यायला तयार नाही. लग्न जमत नाही. आमदारांनी लग्न जुळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती तो कार्यकर्ता आमदारांना करतो.
आमदारही त्याला त्याचा बायोडेटा पाठवून द्यायला सांगतात. त्या ध्वनीफितीमधील संवादाच्या खरेपणाबद्दल शंका उपस्थित होऊ शकतील. तथापि त्या संवादाने समाजातील एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे नक्की! याच मुद्यावरुन सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर काही दिवसांपूर्वी काढण्यात आलेला नवरदेव मोर्चाही समाज माध्यमात गाजत आहे. लग्न जमत नसलेले तरुण नवरदेवाच्या वेशात मोर्चात सहभागी झाले होते. ‘बायको मिळावी’ अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली. लोकांना लोकप्रतिनिधींकडून काय काय अपेक्षा असतात. आमदारांनी तरी काय काय कामे करावीत? सोलापुरातील शासकीय अधिकार्यांनी तरी मोर्चेकर्यांना काय उत्तर द्यावे? या समस्येने त्यांनाही निरुत्तर केले असेल. समाजातील मुलामुलींचे गुणोत्तर विषम आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत आहे, हेही या समस्येचे एक कारण आहे. मुलींची संख्या अशीच कमी होत राहिली तर काही काळाने मुलांचे विवाह होणार नाहीत. कारण त्यांना वधू मिळणार नाही, याकडे समाजतज्ञ सरकारचे सातत्याने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याचेच प्रत्यंतर सोलापूर आणि औरंगाबाद घटनेने आणून दिले आहे.
राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये दर हजार मुलांमागे मुलींची संख्या नऊशेपेक्षाही कमी झाली आहे. राज्यात हीच संख्या सरासरी 906 आहे. राज्याचा आरोग्य विभाग आणि नागरी नोंदणी प्रणाली यांनी ही आकडेवारी माध्यमांना दिली. मुलगी ‘नकोशी’ का होते याचा विचार सर्वांनीच करायला हवा. या भीषण समस्येचे चटके आता सर्वांनाच बसत आहेत. लग्न होत नाही म्हणून तरुण मुले आणि त्याचे पालक हतबल आहेत. पालकांच्या बदललेल्या अपेक्षा हेही तरुणांचे लग्न न जमण्याचे एक कारण असल्याचे जाणते सांगतात. अवाजवी हुंड्याची मागणी आणि मुलांच्या पारंपरिक अपेक्षांमध्ये बदल झालेला नाही याकडे मुलींचे पालक लक्ष वेधतात तर, मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या वाढत्या अपेक्षांकडे मुलांचे पालक लक्ष वेधतात. मुली मागण्यांचे स्वरुप बदलल्याचेही सांगतात. कारणे कोणतीही असली तरी या परिस्थितीमुळे लग्नाजोगे वय असलेल्या मुलामुलींमध्ये नैराश्य येते याकडे मानसोपचारतज्ञ समाजाचे लक्ष वेधायचा प्रयत्न करीत आहेत. लग्नासाठीच्या पारंपरिक निकषांवर पुन्हा विचार केला जाऊ शकेल का? मुलामुलींच्या पालकांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सर्वांनीच तडजोडीची तयार दाखवली तरी या समस्येचा ताण थोडातरी हलका होण्याच्या शक्यतेकडे मानसोपचार तज्ञ समाजाचे लक्ष वेधतात. नवरदेवाच्या वेशात मोर्चा काढून किंवा लोकप्रतिनिधीला दूरध्वनी करुन समस्या कदाचित विनोदाचा विषय बनू शकेल, पण सुटणार नाही. समग्र विचाराने परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जाणत्यांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
माज माध्यमांवर एक आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यामधील संवादाची एक ध्वनीफित फिरत आहे. क्लिपमधील संवाद मोठा मजेशीर आहे. परिस्थिती सधन असूनही कोणीही मुलगी द्यायला तयार नाही. लग्न जमत नाही. आमदारांनी लग्न जुळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती तो कार्यकर्ता आमदारांना करतो. आमदारही त्याला त्याचा बायोडेटा पाठवून द्यायला सांगतात. त्या ध्वनीफितीमधील संवादाच्या खरेपणाबद्दल शंका उपस्थित होऊ शकतील. तथापि त्या संवादाने समाजातील एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे नक्की! याच मुद्यावरुन सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर काही दिवसांपूर्वी काढण्यात आलेला नवरदेव मोर्चाही समाज माध्यमात गाजत आहे. लग्न जमत नसलेले तरुण नवरदेवाच्या वेशात मोर्चात सहभागी झाले होते. ‘बायको मिळावी’ अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली. लोकांना लोकप्रतिनिधींकडून काय काय अपेक्षा असतात. आमदारांनी तरी काय काय कामे करावीत? सोलापुरातील शासकीय अधिकार्यांनी तरी मोर्चेकर्यांना काय उत्तर द्यावे? या समस्येने त्यांनाही निरुत्तर केले असेल. समाजातील मुलामुलींचे गुणोत्तर विषम आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत आहे, हेही या समस्येचे एक कारण आहे. मुलींची संख्या अशीच कमी होत राहिली तर काही काळाने मुलांचे विवाह होणार नाहीत. कारण त्यांना वधू मिळणार नाही, याकडे समाजतज्ञ सरकारचे सातत्याने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याचेच प्रत्यंतर सोलापूर आणि औरंगाबाद घटनेने आणून दिले आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये दर हजार मुलांमागे मुलींची संख्या नऊशेपेक्षाही कमी झाली आहे. राज्यात हीच संख्या सरासरी 906 आहे. राज्याचा आरोग्य विभाग आणि नागरी नोंदणी प्रणाली यांनी ही आकडेवारी माध्यमांना दिली. मुलगी ‘नकोशी’ का होते याचा विचार सर्वांनीच करायला हवा.
या भीषण समस्येचे चटके आता सर्वांनाच बसत आहेत. लग्न होत नाही म्हणून तरुण मुले आणि त्याचे पालक हतबल आहेत. पालकांच्या बदललेल्या अपेक्षा हेही तरुणांचे लग्न न जमण्याचे एक कारण असल्याचे जाणते सांगतात. अवाजवी हुंड्याची मागणी आणि मुलांच्या पारंपरिक अपेक्षांमध्ये बदल झालेला नाही याकडे मुलींचे पालक लक्ष वेधतात तर, मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या वाढत्या अपेक्षांकडे मुलांचे पालक लक्ष वेधतात. मुली मागण्यांचे स्वरुप बदलल्याचेही सांगतात. कारणे कोणतीही असली तरी या परिस्थितीमुळे लग्नाजोगे वय असलेल्या मुलामुलींमध्ये नैराश्य येते याकडे मानसोपचारतज्ञ समाजाचे लक्ष वेधायचा प्रयत्न करीत आहेत. लग्नासाठीच्या पारंपरिक निकषांवर पुन्हा विचार केला जाऊ शकेल का? मुलामुलींच्या पालकांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सर्वांनीच तडजोडीची तयार दाखवली तरी या समस्येचा ताण थोडातरी हलका होण्याच्या शक्यतेकडे मानसोपचार तज्ञ समाजाचे लक्ष वेधतात. नवरदेवाच्या वेशात मोर्चा काढून किंवा लोकप्रतिनिधीला दूरध्वनी करुन समस्या कदाचित विनोदाचा विषय बनू शकेल, पण सुटणार नाही. समग्र विचाराने परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जाणत्यांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.