Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखमाणुसकीचा सन्मान समाजाच्या चांगुलपणाला पोषक!

माणुसकीचा सन्मान समाजाच्या चांगुलपणाला पोषक!

सध्या सार्वजनिक सणांचा हंगाम आहे. श्रावण महिना सुरु झाला की राखीपौर्णिमा, Rakhipoornima दहीहंडी, गणपती, नवरात्र, दसरा अशा सणांची रांगच सुरु होते. या सणांच्या निमित्ताने लोक एकत्र येतात. भावनांचे प्रगटीकरण होते. सहकाराची आणि समानतेची भावना वाढीला लागते.

करोनामुळे गेले दीड वर्ष सर्व प्रकारचे सामाजिक आविष्कार तात्पुरते थांबले आहेत. सध्या निर्बंध काही प्रमाणात हटवले गेले असले तरी निर्बंधांच्या सुरुवातीच्या काळात माणसे सक्तीने घरी बसवली गेली होती. अद्यापही सिनेमा, नाटके आदी करमणुकीची सर्व साधने आजही बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी सार्वजनिक सणांची ओढ माणसांना लागणे स्वाभाविक आहे. सण साजरे करण्याचा मूळ हेतू कायम ठेवून त्या सणांना व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न काही नेते आणि सामाजिक संस्था करत आहेत. असा एक प्रयोग नुकताच पुण्यात घडला. खा. सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांनी एक वेगळा दृष्टिकोन राखीपौर्णिमेच्या निमित्ताने समाजासमोर मांडला. त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, पोलीस यांना राखी बांधली.

- Advertisement -

करोनाच्या या काळात असे अनेकजण मकरोना योद्धेफ म्हणून काम करत आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले. पण या सगळ्यांनी कर्तव्यनिष्ठेचा आदर्श समाजासमोर उभा केला. समाजाने ती जाणीव ठेवावी म्हणून त्यांचा सन्मान सुप्रिया सुळे Supriya Sule यांचा हाताने करवण्यात आला. नेत्यांचा दृष्टिकोन कार्यकर्त्यांना आणि समाजाला देखील विचारांची नवी दिशा दाखवतो. सत्कार, जाहीर कार्यक्रम यांचे स्वरूप बदलण्यास कारण ठरतो.

सध्या नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने ‘नो हेल्मेट; नो पेट्रोल’ ही मोहीम राबवली जात आहेत. वाहन चालवतांना ‘स्वसुरक्षा’ महत्वाची असे वाहनचालकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबद्दल वाहनचालक बरीच बेफिकिरी दाखवतात. राखीपोर्णिमेनिमित्त महिला पोलीस आणि पेट्रोल पंपावर काम करणार्‍या महिला सेवकांनी हेल्मेट परिधान केलेल्या वाहनचालकांना राख्या बांधल्या.

समाजातील माणुसकी समृद्ध करणारा असाच एक अनुभव एका भगिनीला देखील आला. राखीपौर्णिमा Rakhipoornima साजरी करण्यासाठी एक बहीण मुंबईवरून नाशिकला माहेरी आली होती. रोकड आणि दागिन्यांची पिशवी रिक्षातच विसरल्याचे घरी गेल्यावर तिच्या लक्षात आले. तिने पोलिसांच्या कानावर हा प्रसंग घातला. पोलिसांनीही तत्परतेने घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्हीवरचे चलचित्रीकरण तपासले. त्याच्या मदतीने रिक्षाचालकाला शोधले. त्याच्याकडून पिशवी ताब्यात घेऊन त्या महिलेच्या हवाली केली.

पिशवी सापडली नाही तरी कुटुंबीय काय म्हणतील असा प्रश्न त्या महिलेला पडला होता. तथापि पोलिसांच्या पुढाकारामुळे आणि रिक्षाचालकाच्या सहकार्यामुळे राखीपोर्णीमेच्या दिवशी तिच्या चेहर्‍यावर हसू फुलले. माणुसकीचा सन्मान करण्यासाठी आणि या सत्प्रवृत्तींबद्दल समाजाला आदर आहे ही भावना कृतीने दाखवावी या हेतूने सुप्रियाताईंनी पुढाकार घेतला असावा. तो समाजाला मार्गदर्शक ठरावा. समाजात माणुसकीला आव्हान देणार्‍या घटना घडतात. स्वार्थासाठी लोक नातेसंबंध देखील पणाला लावतांना आढळतात.

महिलांवरील अन्याय आणि अत्याचार वाढत आहेत. पण फक्त तेवढेच घडते का? समाजात माणुसकी देखील रूजत आहे ही भावना अशा कार्यक्रमांमुळे वृद्धिंगत होण्यास मदत होते. समाजहितासाठी राबणारांविषयी लोकांच्या मानत आदराची भावना हे संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचे मोठेच काम असे सन्मान सोहळे पार पाडतात. संवेदनशील व्यक्तींचे सामाजिक भान वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होते हेच यावरून लक्षात येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या