Tuesday, April 23, 2024
Homeजळगावभवरलालजी: जैन महान शैक्षणिक तत्वज्ञ

भवरलालजी: जैन महान शैक्षणिक तत्वज्ञ

‘कृषी, शिक्षण आणि उद्योग

या क्षेत्राला आपण नवसंजीवनी दिली

- Advertisement -

देशाभिमान राखताना आपण

ग्रामीण भागात जनतेला दूरदृष्टी दिली…’

भवरलाल जैन यांच्या कृषि संशोधन व शेक्षणिक कार्यामध्ये आधिक तंत्रज्ञान, नवीन पीक पद्धती, ठिबक सिंचन पद्धत, उती-संवर्धन यामुळे पाण्याची व विजेची बचत होऊन मालाचा दर्जा सुधारून गुणवत्ता वाढल्याने मालाची निर्यात होऊन शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती झाली.

भवरलाल जैन यांनी शेतकर्‍यांना स्वयंरिद्ध बनविले. पाण्याचे व्यवस्थापन व नियोजन केले. ठिबकच्या माध्यातून काटकसरीने पाणी वापर पर्यारणाचे संरक्षण व संवर्धन केले. भवरलालजी जैन यांनी जळगाव जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले.

कृषी तज्ज्ञाबरोबर ते शिक्षणतज्ज्ञ ही होते. महान तत्वज्ञ म्हणून मला त्यांची प्रचिती आली. त्यांचे शिक्षणा विषयीचे मत आजच्या काळाची गरज आहे त्यांच्या 12 डिसेंबर जन्मदिनाच्या औचित्याने त्यांचे केलेले हे स्मरण.

आज शिक्षणाचा ग्रंथाच्या जगाशी संपर्क तुटला आहे. श्रमाशी शिक्षणाचा संबंध राहिलेला नाही, श्रमाने आत्मोन्नती आणि आत्मशुद्धी होते. या थोर विचारवंताच्या श्रद्धांना आजच्या शिक्षण क्षेत्रात थारा नाही. चांगला माणूस तयार करण्याच्या कामापासून शिक्षण-क्षेत्र दूर गेलेले आहे. श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देणारी प्रणालीमध्ये सुनियोजित कार्यक्रम केला आहे. शिकण्यातील फक्त नोकरदार तयार न करता नोकरी देणारा मालक तयार करणे. हे भवरलालजी स्वप्न होते व ते त्यांनी यशस्वी करून दाखविले.

नव्या पिढीच्या पालकांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त, स्वावलंबन, निसर्ग देश, मानव, पक्षी व प्राणी, यांच्या बद्दल प्रेम निर्माण होण्यासाठी ते स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी अनुभूतीची स्थापना केली होती. शिक्षक हा शिल्पकार असतो आणि तो शिल्पातून विद्यार्थ्यांची मूर्ती आकाराला आणतो उत्कृष्ट शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यात एक देखणे शिल्प दिसते.

शिक्षकांचे ध्येय हे राष्ट्र बांधणीचे असते. राष्ट्राची बांधणी हे देशाच्या आदर्श आणि देश प्रेमी नागरिकांवर अवलंबून असते आपल्या विद्यार्थ्यांमधून असे देश प्रेमी नागरिक घडविणे हे शिक्षकाचे काम असते. शिक्षकांचे विद्यार्थ्यावर प्रेम नसणे हा शिक्षणातला सर्वात मोठा अडथळा आहे. शिक्षणाची आवड या निकषावरच शिक्षकांची निवड व्हायला पाहिजे शिक्षक हे समर्पित व सहनशीलता असणारे हवेत जो शिक्षक विद्यार्थ्यांना विषयाची ओळख करून देतो, त्याला विषयाची गोडी लावतो, आणि स्वतंत्रपणे तो विषय समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेम करतो व त्याच्या सुप्तगुणांना वाव देतो तोच खरा शिक्षक भारताला जर शक्तिशाली आणि सामर्थ्यवान राष्ट्र बनवायचे असेल शिक्षण हेच प्रभावी साधन आहे. त्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था उत्कृष्ट असायला पाहिजे.

भवरलाल जैन यांच्या साहित्यावर मूल्यांचा जबरदस्त प्रभाव आहे. समाजातील ढासळत्या मूल्यांमुळे त्यांचे संवेदनशील मन अस्वस्थ होते. या अस्वस्थपणाला त्यांनी आपल्या लिखाणाद्वारे मोकळी वाट करून दिलेली आहे 1986 च्या नवीन शैक्षणिक धोरण आणि सांगितलेल्या 10 मूल्य विषयक विचारांचा शोध भवरलाल जैन यांच्या साहित्यात आढळतो.

शैक्षणिकमुल्य  वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रभक्ती, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रप्रेम, वक्तशीरपणा सर्वधर्मसमभाव, नीटनेटकेपणा, स्त्री-पुरुष समानता संवेदनशीलता सौजन्यशीलता. शिक्षक हा भावनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कसा विकास होईल त्याच्या अंगी माणुसकी कशी रुजेल आणि डोक्याचा वापर करण्यापेक्षा मनाचा आणि हृदयाचा उपयोग कसा करू शकतील.  याची उत्तरे देणार्‍या पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे ही काळाची गरज आहे. प्रथम माणूस घडवा त्याला सुशिक्षित सुसंस्कातीत करा, असे झाले तर राष्ट्र आपोआपच घडेल शिक्षण हे भवितव्याची आणि भविष्याची गुंतवणूक असते. मानवी स्वभावाचे आणि चारित्र्याची बधणे शालेय जीवनातच मिळतात.

प्रत्यक्ष कृतीवर आधारितच भविष्याशी निगडीत शिक्षण देणारी शिक्षक पाहिजेत.भवरलाल जैन यांनी आपल्या लेखनातून व व्याख्यानांतून समाज प्रबोधनाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवलेले आहे. त्यांचे जीवन कार्य आणि विचार प्रेरणादायी असून ते समर्पित सेवेची उदारणच नाही तर त्यांनी केलेले जीवन समर्पण आणि त्यातून निर्माण झालेला सामाजिकता जीवनाला प्रेरणादायक आहे.

महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पडला होता. गांधीतीर्थ निर्मिती म्हणजे भवरलाल जैन यांनी जपलेल्या दीर्घकालीन स्वप्नाची पूर्तता हे महात्मा गांधीजींच्या सत्य अहिंसा प्रेम या विचारांनी नवसंजीवनी देत नव्या पिढीसाठी गांधी विचारांना अजमर करण्याचा प्रयत्न त्यांनी गांधीजींच्या भव्य वस्तू आणि इतिहासिक वास्तूच्या माध्यमातून करण्यात आला. आज 12 डिसेंबर हा पद्मश्री भवरलाल जैन यांचा जन्मदिन त्यांच्या पवित्र स्मृतिना त्रिवार अभिवादन.

सामाजिक आणि संवेदनषीलता

आपण आयुष्यभर जपत आलात.

या वरूनच भारताचा यषस्वी आधारस्तंभ

आपण क्षणोक्षणी घडवत आतात….

(लेखिका प्राचार्या  डॉ.  संगीता. आर. बाफणा यांनी भवरलाल जैन यांच्या कार्य, व्यक्तिमत्त्वावर पीएच. डी. केलेली आहे.)

डॉ. संगीता बाफणा

- Advertisment -

ताज्या बातम्या