Friday, April 26, 2024
HomeUncategorizedबुजुर्गों का साया…

बुजुर्गों का साया…

बुजुर्ग म्हणजे ज्येष्ठ, वडीलधारी मंडळी आणि साया म्हणजे सवलीरूपी आशीर्वाद. परवा नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जी सप्तपदी सांगितली, त्यात आपल्या घरात जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना कोरोनापासून जपा, त्यांची काळजी घ्या; असे आवाहन केले आहे.

भारतातील कुटुंबव्यवस्था ढासळत चालली असून ज्येष्ठ नागरिकांना छोट्या जागा आणि सन्मान दोन्ही राहिला नाही, म्हणूनच वृद्धाश्रमात गर्दी वाढली आहे. अशा या वृद्धांनी वयाच्या 60 वर्षांपर्यंत विविध करांचा भरणा केला आहे. त्यांना सन्मानाची संध्याकाळ सरकारनेच द्यायला हवी. देशाच्या उत्पन्नात थोडे का होईना, पण योगदान दिले आहे. उपकार नव्हे पण तो त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळायलाच हवा, हा विचार पुढे आला असून तो अर्थक्रांतीचे अनिल बोकील, यमाजी मालकर समाजात रुजवत आहेत. वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती अटळ आहे.

- Advertisement -

गदिमा यांनी जगाच्या पाठीवर या चित्रपटातील एक गाण्यात बालपण, तरुणपण आणि म्हातारपणाची मांडणी करताना बालपणाला अंगडी, तारुण्यासाठी रंगीत वसने आणि वर्धक्याला जीर्ण शालीची उपमा दिली आहे तर राजकपूर बुढापा देखकर रोया, असे म्हटले आहे. माणसाला अटळ असणारे हे वृद्धत्व आणि त्या वृद्धावस्थेचा सन्मान करणारी सामाजिक व्यवस्था असायला हवी आहे. स्व. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी जानेवारी 1999 मध्ये ज्येष्ठ नागरिक कायदा संसदेत पास केला आहे. 2011 च्या जनगणनेच्या आधारे देशातील एकूण लोकसंख्येच्या 10 पट ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे आजमितीला भारतात 15 ते 16 कोटी ज्येष्ठ नागरिक देशात आणि महाराष्ट्रात सुमारे 20 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत.

त्यापैकी पाच टक्के वृद्धांची संध्याकाळ सन्मानाची असेल कारण त्यांनी मरेपर्यंतची तरतूद केलेली असेल. इतरांच्या वाट्याला हेटाळणी आणि मानहानी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या देशात नद्या, पशुपक्षी यांना राष्ट्रीयत्वचा दर्जा आहे, पण ज्येष्ठ नागरिकांना मात्र नाही. 15 कोटी ज्येष्ठ नागरिक ही एक सक्षम मतपेढी आहे, या भावनेतून राजकीय पक्षांनी तरी त्यांचा सन्मान करायला हवा. वृद्धत्व किंवा ज्येष्ठत्व म्हणजे शहाणपण आणि अनुभवाचा खजिना असतो. पण चौकोनी कुटुंबात त्यांना ‘ना आदर ना सन्मान’ उलट ती अडगळ वाटावी, अशी बाब बनू पाहत आहे. त्या ज्येष्ठांचे शारीरिक मानसिक आरोग्याचे प्रश्न असतात. त्यांना गरज असते आधाराची, प्रेमाच्या चार शब्दांची आणि आपुलकीची. त्यांच्या जगण्याची मूळ आस असते ती प्रतिष्ठेचे जीवन आणि सन्मानाचा मृत्यू किंवा विलय पण त्यालाही ते पारखे झाले आहेत आणि म्हणूनच मोदींनी सप्तपदीत प्रथम ज्येष्ठांचा आदर आणि काळजी घेण्याचे आवाहन केलेले दिसते.

- Advertisment -

ताज्या बातम्या