Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना नेते सरनाईक यांच्याकडे ईडीची धाड

शिवसेना नेते सरनाईक यांच्याकडे ईडीची धाड

ठाणे

शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) धाड टाकल्याची माहिती मिळत आहे. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचं पथक सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचले आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisement -

प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांवर सकाळी छापा टाकण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले आहे. दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरु आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या