Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीची छापेमारी; ९ ठिकाणी कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीची छापेमारी; ९ ठिकाणी कारवाई

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे ईडीने (ED) नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी (Raid) केल्याची माहिती मिळत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे…

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. यावेळी 40 हजार घरांसाठी चार हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट देण्याबाबत ही निविदा काढण्यात आली होती. निविदा एकाच आयपीवरुन भरली असल्याचे उघडकीस आले होते.

त्यामुळे अटींचा भंग केल्याप्रकरणी यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पिंपळगावला परराज्यातील ३१ लाखांचा मद्यसाठा जप्त

आज सकाळी ईडीने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. ई निविदा प्रकरणात अटींचा भंग केल्याप्रकरणी यापूर्वीच शहरातील सिटी चौक पोलिसात 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा आरोप या सर्वांवर आहे. आता ईडीकडून शहरातील विविध ठिकाणी छापेमारी सुरु आहे.

अमृता फडणवीसांना १ कोटी लाचेची ऑफर देणारी ‘अनिक्षा’ कोण?

- Advertisment -

ताज्या बातम्या