Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर इडीचे छापे

Share

मुंबई | वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते तसेच विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानासह साखर कारखाना आणि नातेवाईकांच्या घरांवर आज आयकर विभागाने छापे घातल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पथकातील अधिकारी कागदपत्रांची तपासणी करत असून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नाही.

आयकर आणि ईडीचे पथक आज सकाळी साडेपाचच्या सुमारास मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानावर पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी कागदपत्रांची तपासणी तसेच इतर मालमत्तांची चौकशी सुरू केली आहे. ईडी आणि आयकरने छापा घातला त्यावेळी मुश्रीफ घरीच असल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे, मुश्रीफ यांच्या नातेवाईकांच्या घरांवरही  आयकर विभाग आणि ईडीने छापे घातल्याची माहिती समजते आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. इडीच्या छाप्यामुळे राजकीय वातावरणातही खळबळ उडाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!