Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशदेशात जूननंतर आर्थिक मंदी : नारायण राणे

देशात जूननंतर आर्थिक मंदी : नारायण राणे

पुणे | Pune

कोरोनाच्या संकटातून देश बाहेर निघत नाही, इतक्यात नवीन आव्हानाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षात सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली असताना आता पुन्हा नवे संकट येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

भारतात आर्थिक मंदी जून नंतर अपेक्षित आहे, असे चिंता वाढवणारे विधान केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. पुण्यात आज जी-२० परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

राणे पुढे म्हणाले, जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये मंदी आहे. भारतात आर्थिक मंदी जून नंतर अपेक्षित आहे पण त्याची झळ सामान्य नागरिकांना बसू नये यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे”.

राणेंनी केलेल्या विधानाप्रमाणे देशात जर आर्थिक मंदी आली तर त्याची झळ येथील उद्योग व्यवसायाबरोबरच, रोजगार आणि एकूण आर्थिक परिस्थितीला बाधक ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या