आर्थिक आधारवर गरीब मुसलमांना आरक्षण द्या : मायावती

0
नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यातील सुधारणांचे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानं बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आनंद व्यक्त केला आहे. कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांचे आपण स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र आता अल्पसंख्यांकांना आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी करत मायावतींनी मोदी सरकारसमोर नवा पेच निर्माण केला आहे. गरीब मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण देण्याची व्यवस्था असायला हवी, असंही त्या म्हणाल्या आहेत.

बहुजन समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी आता नवीन डाव टाकत. एससी/एसटी विधेयकातील सुधारणाचं स्वागत करताना त्यांनी आर्थिक निकषावर अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याच्या मागणीचं समर्थन तर केलंच. त्याचबरोबर मुसलमानांना आरक्षण मिळावं अस वक्तव्य देखील त्यांनी केल. लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती सुधारणा विधेयक राज्यसभेत देखील मंजूर होईल अशी आशा मायावती यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*