Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : घोटविहिरानंतर लिंगवणे गावाजवळील डोंगरालाही तडे; नागरिक भयभीत

Share

गोळशी | वार्ताहर

पेठ तालुक्यातील घोटविहिरा येथील रस्त्याला तसेच डोंगराला तडे जाण्याची घटना ताजी असतानाच पेठ तालुक्यातील लिंगवणे गावानजीक असलेल्या डोंगराला भले मोठे तडे वजा खड्डे पडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतरही कोन्हीही अधिकारी याठिकाणी परिस्थिती परिस्थिती बघण्यासाठी आला नसल्याचे येथील ग्रामस्थांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

अधिक माहिती अशी की, गेल्या आठवड्यात शनिवारी (दि. 3 ) व रविवारी (दि. ०४) रोजी जवळच असलेल्या पिंपळवटी गावाजवळ मोठा आवाज आला होता. यावेळी भूकंपाचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला मात्र त्याची कुठेही नोंद झाली नव्हती. त्यामुळे सुटकेचा निश्वास येथील नागरिकांनी सोडला होता.

दरम्यान, या ठिकाणाहून 20/25 किमी अंतरावर असलेल्या लिंगवणे गावानजीक असलेल्या वनविभागाच्या डोंगराला  तडे पडले असून डोंगर तीन फुटापर्यंत खचला आहे. डोंगरासह भागात जमिनीला मोठे तडे गेले आहेत.

मोठ्या भौगोलिक  हालचाली होऊनदेखील शासनदरबारी कुठलीही नोंद झाली नाही. ग्रामसेवक, सरपंच तसेच पोलीस पाटलांनी याप्रकरणी लक्ष घालून माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!