Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या राजकीय

दर तीन महिन्यांनी प्रत्येक विभागात आढावा बैठक घेतली जाणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share
Next review meeting to be held in western Maharashtra, Konkan region: CM Thackeray

नाशिक | प्रतिनिधी 

मराठवाडा आणि विदर्भातील विकासाबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी आढावा बैठकी घेतल्या होत्या. आता उत्तर महाराष्ट्रातील पार पडल्या. यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाच्या आढावा बैठका होणार आहे. आढावा बैठकीचा अजेंडा केवळ विकास हाच असणार आहे. कुठलाही विभाग विकासात मागे राहू नये हा या सरकारचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आज उत्तर महाराष्ट्रातील आढावा बैठकी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडल्या. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नांना बगल देत ठाकरे यांनी विकासावर बातचीत केली.

ते म्हणाले, हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे, राज्यात विकास वाढीस लागावा यासाठी हे सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. राज्यात विभागवार आढावा बैठकी घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत. राज्यात दर तीन महिन्यांनी आपण स्वतः विकासकामांचा आढावा घेणार असून त्यानुसार वेळोवेळी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारयांचा सहभाग असल्यामुळे जिल्हानिहाय विकासकामे, योजनांची अंमलबजावणी होण्यास सोयीस्कर होणार असलायचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!