एकही गुंतवणूकदाराचे पैसे बुडवणार नाही – बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी

0
पुणे |  डीएसके यांनी कोणाला फसवलं नसून प्रत्येक गुंतवणूकदराचे पैसे परत केले जातील असे आश्वासन पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांना दिले आहे. ते आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारम्ध्यामांशी संवाद साधत होते.

त्यांच्या आश्वासनामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सोशल माध्यमांकडून चुकीचा प्रचार झाल्यामुळे नकारात्मक प्रसिद्धी झाली आणि त्यामुळे माध्यमांतदेखील नकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या. यामुळे हे प्रकरण वाढले आहे.

आम्ही कुणाला फसवलेले नाही. फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही. फसवणे वेगळे आणि पैसे वेळेत परत न करणे वेगळे आहे. आम्ही सर्वांचे पैसे परत करणार असून एकाचेही पैसे बुडवणार नाही असे डी एस कुलकर्णीं यांनी गुंतवणूकदारांना आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

*