एसबीआयच्या रांगेतून ग्राहकांची होणार सुटका ; नो क्यू या अ‍ॅपवरून घेता येणार ई टोकन

0
नाशिक : स्टेट बँक ऑफ इंडियाशी निगडीत छोटया मोठया कामांसाठी लावावी लागणारी रांग, त्यातून वाया जाणारा वेळ यापासून आता ग्राहकांची सुटका होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक नो क्यू या अ‍ॅपवरून ई टोकन घेवू शकतात. ही सुविधा बँकेने उपलब्ध करून दिल्याने लाखो ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

अँड्रॉईड स्मार्टफोन धारक गुगल प्ले स्टोअरवरून आणि अ‍ॅपल फोनधारक अ‍ॅपल स्टोरवरून नो क्यू अ‍ॅप डाउनलोड करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक ई टोकन घेवून बॅकेच्या निवडक शाखांमध्ये सेवांचा लाभ घेवू शकतात. ई टोकन घेतलेले ग्राहक त्यांना देण्यात आलेल्या क्रमांकानुसार काउंटरवर जावून सेवा प्राप्त करून घेवू शकतात.

त्यासाठी त्यांना आता रांग लावण्याची गरज नाही. एसबीआयच्या या नव्या अ‍ॅपचे लॉन्चिग बँकेच्या अध्यक्षा अरूंधती भटटाचार्य यांनी मागील वर्षात केले होते.

हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क मोजावे लागणार नाही. ग्राहकांचा अमूल्य वेळ वाचविण्यासाठी या अ‍ॅपची सुरवात करण्यात आल्याची माहिती बँकेने दिली आहे.

ई टोकनच्या माध्यमातून ग्राहकांना अ‍ॅपच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाच सेवा निवडता येतील त्यात.

कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉल, चेक डिपॉझिट, डिमांड ड्रा, एनएफटी, आरटीजीएस सारख्या सेवासाठी ग्राहक अ‍ॅपच्या माध्यमातून टोकन उपलब्ध करून घेवू शकतात. बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या लोकांबददलचे रिअल टाईम स्टेटस नो क्यू अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना समजेल.

त्यामुळे घरी असतांना, ऑफीसात काम करीत असतांना बँकेच्या काउंटरवरील रांगेत नेमके किती लोक याची माहिती त्यांना यावेळी मिळेल. रांगेत गर्दी नसेल त्यावेळे त्यांना बँकेत जावून त्यांना अपले काम कमीत कमी वेळेत करून घेता येईल.

LEAVE A REPLY

*