महाराष्ट्र दिन : महाराष्ट्र निर्मिती साठी लढलेल्या कामगारांचा दिवस

महाराष्ट्र दिन : महाराष्ट्र निर्मिती साठी लढलेल्या कामगारांचा दिवस

नाशिक : १ मे हा महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी bombay registration act नुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबई महाराष्ट्राची राजधानीं म्हणून घोषित झाली. या दिवशी तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मा. यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व दिले.

यामागची पार्श्वभूमी अशी की, २१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी राज्य पुन:रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र व मुंबई येथील फ्लोरा फाउंटन परिसरात तणावाचे वातावरण होते. याच्या निषेधार्थ मुंबईत कामगारांचा मोर्चा काढण्यात आला. त्यावर पोलिसांनी लाठीमार केला. जमाव ऐकत नव्हता म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबार करण्याचे आदेश दिले. यात जवळपास १०५ आंदोलनकर्ते शहीद झाले. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी लोकांच्या चळवळीमुळे महाराष्ट्र राज्याची स्थापना केली गेली.

जगातील जवळजवळ सगळ्या देशात १ मे हा जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा करतात. या दिवशी सर्व कामगारांना सुटटी असते.

औद्योगिक क्रांतीमुळे अमेरिकेत उद्योगांची भरभराट झाली होती. कामगारांना १२-१८ तास काम करावे लागे. महिला आणि मुलांना देखील सवलत नव्हती. यातून कामगार संघटना उदयास आल्या मालक दडपशाही करत होत्या. ४ मे १८८६ हे मार्केट शिकागो येथे घडलेल्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

१ मे १८८६ साली शिकागो येथे कामगारांच्या मागण्यांसाठी सार्वत्रिक बंद पाळण्यात आला. ३ मे ला पोलिसांनी कामगारांवर गोळीबार केला. ४ मेला कामगार संघटनेने निषेध सभा भरवली. पोलीस आणि कामगार यांच्यात झालेल्या गोळीबारात पोलीस आणि कामगार मारले गेले. अनेक कामगारांना फाशी झाली. या घटनेनंतर ‘कामाचे ८ तास ‘ ही चळवळ पसरली. म्हणून १ मे दिवस कामगार स्तरावर जागतिक स्तरावर पाळला जाऊ लागला.

महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम भागात आहे. महाराष्ट्र हा संत, ऋषी, देशप्रेमी, शूरवीर यांची भूमी आहे महाराष्ट्राने कला, शिक्षण, साहित्य, कृषी विज्ञान , संगणक या क्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
बहू असोत सुंदर संपन्न की महा |
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ||

१मे या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क येथे परेड आयोजित केली जाते. या दिवशी राज्यपाल संदेश देतात . महारष्ट्रात शैक्षणिक संस्था, कार्यालये, उद्योग, कंपनी, बँकांना सुट्टी असते. या दिवशी राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येते.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com