नाशिकमध्ये ई-चालान प्रणाली सुरू; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या हस्ते उद्घाटन

0
नाशिक : शहरातील बेशिस्त वाहतुकीला वादविवाद टाळत आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलीसांच्या वतीने आजपासून शहरात ई चालान प्रणाली कार्यान्वीत केली आहे. याद्वारे ऑनलाईन दंडवसुलीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर पुराव्यानिशी तसेच ऑनलाइन दंडात्मक कारवाई करता येणे शक्य झाले आहे.

शहर पोलीस मुख्यालय येथे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते या ई चलान प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. शहर वाहतूक शाखेस ई चलानसाठीची यंत्रे त्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली आहे.

शहराच्या वाहतूकीस शिस्त लागावी, तसेच बेशिस्त वाहनचालकांकडून कॅशलेस दंड वसुल व्हावा, वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमधील वादविवाद कमी करण्याच्या हेतूने महिन्यांपूर्वी शहर वाहतूक शाखेने ई चलान प्रणाली सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पोलीस आयुक्तांच्या मान्यत्येनंतर या प्रणालीला मंजुरी देण्यात येऊन याची यंत्रणा खरेदी करण्यात आली आहे. आज प्रत्यक्ष ही प्रणाली स्विकारली आहे.

या प्रणालीमुळे बेशिस्त चालकांवर पुराव्यानिशी कारवाई करता येणे सोपे झाले आहे. वाहतूक नियम मोडणारर्‍या वाहनाचा नंबरप्लेटसह छायाचित्र तसेच चालकांचे छायाचित्रे काढून त्याचा पुरावा म्हणून या यंत्रणेत जतन करण्यात येणार आहे. यामुळे पुन्हा काही नियम मोडल्यास यापुर्वीचे सगळा इतिहास पोलीसांना लगेच उपलब्ध होणार असून त्यानुसार दंड आकारण्यात येणार आहे.

या प्रणालीचा वापर करून जागेवरच पोलीस सबंधीत वाहनचालकास चालान देणार आहेत. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने संबंधीत चालकास दंडाची पावती त्यांच्या मोबाईल क्रमांकावर तसेच घराच्या पत्त्यावर पाठवण्यात येणार आहे. चालकास दंड भरण्यासाठी वाहतूक पोलिसांकडील ई चालान यंत्रलाच स्वाइपची सुविधा पुरवण्यात आली आहे.

पैसे नसल्यास वोडाफोन स्टोअरमध्ये किंवा ऑनलाइन पद्धतीने व अखेरीस वाहतूक शाखेच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन दंड भरण्याची सुविधा चालकास उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजपासून सर्व शहरभर ही प्रणाली सुरू करण्यात आली असून नागरीकांनी आता या प्रणाली प्रमाणेच वाहतुक पोलीसांना दंड भरायचा आहे. तर या व्यतिकरक्त पैसे मागणारांची तक्रार करण्याचे आवाहनही योवळी आयुक्तांनी केले.

LEAVE A REPLY

*