Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

द्वारका : घरफोडी करणाऱ्या संशयिताकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

Share

नाशिक । द्वारका येथील संत कबीर नगर परिसरात घरफोडी करणार्‍या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीतील 2 लाख 8 हजार 464 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

रईस सईद शेख (25, रा. वडाळा गाव) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारका येथील दिनेश लक्ष्मण कल्याणी यांच्या घरी 1 नोव्हेंबरला घरफोडी झाली होती. चोरट्याने दिनेश यांच्या घराची खिडकी तोडून घरातील 3 लाख रुपये रोख व 25 हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक विजयसिंग जोनवाल यांनी तपास करून खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर. व्ही. हांडे, उपनिरीक्षक जोनवाल, हवालदार सुधीर पाटील, पोलीस नाइक राजेंद्र मोजाड, पोलीस शिपाई संतोष पवार, समाधान गायकवाड, गणेश निंबाळकर, कैलास वाघचौरे यांच्या पथकाने रईस शेख यास अटक केली.

त्यास न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.12) पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये रोख, 15 हजार रुपयांचा मोबाइल, 73 हजार 464 रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 8 हजार 464 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!