द्वारकाजवळील वाहतूककोंडी फुटणार; सबवेसाठी 65 कोटी मंजूर

0

नाशिक । दि. 15 प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावर शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामातील  त्रुटी दूर करून शहरातील वाहतूककोंडी दूर करण्याच्या प्रश्नावर तोडगा काढत  येथील सबवे वाढवून फ्री लेफ्ट तयार करून नाशिकरोडकडील वाहनांना बायपास दिला जाणार आहे.

सोबतच पंचवटी कॉलेजसमोर बायपास, लेखानगर येथे यूटर्न, कमोदनगर येथे सबवे अशा विविध कामांसाठी 67 कोटी रुपयांना मंजुरी मिळाल्याची माहिती आ. देवयानी फरांदे यांनी दिली.

त्यामुळे शहराच्या हद्दीतून जाणार्‍या मुंबई-आग्रा महामार्ग पुलाच्या तांत्रिक चुकीमुळे द्वारकासह विविध ठिकाणी तयार झालेली कोंडी आता फुटणार आहे.

शहरातून जाणार्‍या या पुलातील तांत्रिक चुकांमुळे हा ओव्हरब्रीज नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरला आहे. विशेषत: द्वारका येथील वाहतुकीचा व्यवस्थित अभ्यास न करताच पुलाचे डिझाईन करण्यात आल्याने येथील कोंडी कायम आहे.

लेखानगर, पंचवटी कॉलेज, स्प्लेंडर हॉल, स्टेट बँक चौक अशा जवळपास बारा ठिकाणी तांत्रिक चुकांमुळे वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला होता.

यासाठी आ. देवयानी फरांदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या पुलातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली होती. नितीन गडकरी यांनी यासंदर्भात खासगी सल्लागार कंपनीकडून सर्वेक्षण केले होते. त्यात आढळलेल्या त्रुटी दूर केल्यास वाहतुकीची साडेसाती कमी होईल, असा दावा करण्यात आला होता.

गडकरी यांनी या कामांना आता मंजुरी दिली असून त्यासाठी 67 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आ. फरांदे यांनी दिली. या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या एक महिन्यात ही कामे सुरू होणार आहेत.

त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीची साडेसाती मिटणार आहे. यामुळे द्वारका चौकातील अंडरपाससह येथील अतिक्रमणामुळे तयार होणारी वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

येथील अतिक्रमण व हनुमान मंदिर हटवले जाणार आहे. येथील सबवे वाढवून फ्री लेफ्ट तयार करून नाशिकरोडकडील वाहनांना बायपास दिला जाणार आहे.

सोबतच पंचवटी कॉलेजसमोर बायपास, लेखानगर येथे यूटर्न, कमोदनगर येथे सबवे अशा विविध कामांसाठी 67 कोटी रुपयांना मंजुरी मिळाल्याची माहिती आ. फरांदे यांनी दिली.

मंजूर कामे व निधी 

पंचवटी कॉलेजसमोर सबवे- दीड कोटी, कन्नमवार नवीन पूल – 8 कोटी, द्वारका कोंडी फोडण्यासाठी – 1 कोटी, इंदिरानगर येथील जाळी काढणे 20 लाख, कमोदनगर सबवे – 1.5 कोटी, लेखानगर येथे यूटर्न – 1 कोटी स्टेट बँक चौक येथे सबवे – 1.5 कोटीगॅब्रिएल कंपनीजवळ एन्ट्री पॉईंट- 60 लाख विल्होळी येथे गाड्यांसाठी भुयारी मार्ग – 12 कोटी

कोंडी फुटणारनागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या कामांसाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांना यश येऊन द्वारकासह या महामार्गावरील कोंडी आता फुटणार आहे. -आ. देवयानी फरांदे

LEAVE A REPLY

*