श्रीगोंदा : बनावट सोन्याच्या अंगठ्या विकणाऱ्या दोन महिला गजाआड

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी ) :  बुधवार (दि.२७) रोजी सायंकाळी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व आपल्या सहकार्या समवेत फरार आरोपीचा शोध घेत असताना शहराजवळच्या आढळगाव रस्त्यालगत पोहचले. तिथेच रस्त्यालगत असलेल्या घायपतवाडी जवळ काटवनात दोन माहिला संशयीतरित्या वावरत असल्याचे त्यांना दिसले.
पोवार यांनी आपल्या पथकासह संशयित महिलांचा पाठलाग केला. या महिलांना चौकशीसाठी थांबविण्यात आले. महिलांजवळ असलेल्या पिशवीची तपासणी केली असता पिशवीमध्ये एक किलो वजनाच्या पिवळ्या रंगाच्या बनावट सोन्याच्या अंगठ्याचे गाठोड सापडले. अधिक माहिती घेतली असता मुंबई येथील लोकांना पाच लाख रुपयात स्वस्तात सोने देण्यासाठी या अज्ञात स्थळी बोलावण्यात आल्याचे महिलांनी सांगितले. दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र इतर आरोपी फरार आहे.
स्वस्तात सोने घेण्यासाठी आलेले व्यक्ती ही घटनास्थळी सापडले नाहीत. या कारवाई प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव ,पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वाघ ,दादासाहेब टेके,अविनाश ढेरे,उत्तम राऊत,रवी जाधव, अमोल शिंदे ,अरविंद जाधव,आदींचा समावेश होता

LEAVE A REPLY

*