Friday, May 3, 2024
Homeनगरडंपर खाली सापडून चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू

डंपर खाली सापडून चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

रिव्हर्स येणार्‍या डंपरखाली (Dumper) सापडून चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू (Child Death) झाल्याची घटना संगमनेर (Sangamner) तालुक्यातील मेंढवण (Mendhwan) येथे सोमवारी संध्याकाळी घडली.

- Advertisement -

दुधाच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

माही आजीज पठाण (वय 4, मेंढवण, ता. संगमनेर) असे मयत बालिकेचे नाव आहे. डंपर चालक राजेंद्र भागवत बडे हा सोमवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास माळवाडी वस्ती नेंडवण येथे त्याच्या ताब्यातील डंपर (Dumper) मालकाच्या घरासमोर रिव्हर्स घेत होता. या दरम्यान तेथे जवळच चार वर्षे वयाची बालिका (Child Girl) खेळत होती. डंपर चालकाच्या ही बाब लक्षात आली नाही. खेळत असलेली बालिका डंपर खाली सापडून मृत्यूमुखी (Accident) पडली.

कंपनीत अपघात होऊन कामगार ठार

याबाबत रमजान अहमद पठाण यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात (Sangamner Taluka Police Station) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी डंपर चालक राजेंद्र बडे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 169/2023 भारतीय दंड संहिता304 (अ), 279, 337, 338 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडिझोड करत आहे.

मार्चएण्ड आला तरी झेडपीचा 71 टक्केच खर्च

- Advertisment -

ताज्या बातम्या