ऊस दराबाबत निर्णय न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन तीव्र करणार

0
राहुरी (तालुका प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस उत्पादकांच्या ऊसाला भाव मिळण्यासाठी गुहा येथे आंदोलन केले. त्याचप्रमाणे जिल्हाभर दि. 10 व 16 नोव्हेंबरला गाड्या आडविल्या, ऊस वाहुन कारखान्याकडे जाणारी वाहने आडविली, त्यावेळी प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी तेजस चव्हाण व राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यार्ंना दोनच दिवसात जिल्हाधिकार्‍यांसमोर कारखानदारांसमवेत पहिल्या उचली संदर्भात बैठक लावू, असे आश्‍वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास लावले.
परंतू अद्याप पर्यंत प्रशासनाकडून कोणतीही हालचाल बैठकीबाबत होत नाही. त्यामुळे संघटनेची प्रशासनाने फसवणूक केली असून यापुढे मात्र जिल्हाभर कारखान्याकडे जाणारी ऊसाची वाहने अडविणार व आंदोलन यापुर्वीपेक्षाही तीव्र करणार अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांनी केले आहे.
प्रशासनाने 18 तारखेला कोपर्डी घटनेच्या निकालाचे कारण दिले, त्यानंतर 21व 23 नोव्हेंबरला बैठक घेण्यासाठी सांगण्यात आले.
परंतू प्रशासन व कारखानदार केवळ वेळकाढूपणाची भुमिका घेत असून शेतकरी संघटना यापुढे कोणतीही पुर्वसुचना न देता पुर्वी पेक्षाही तीव्र आंदोलन करणार असून आज पासून जिल्ह्यात कोणत्याही क्षणी आंदोलनास सुरूवात होणार आहे. कारखानदार व प्रशासनाच्या या भुमिकेमुळे ऊस वाहतूकीचे चाके जागेवर थांबविताना उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत. आंदोलनाला वेगळे वळण लागल्यास प्रशासनाची जबाबदारी राहील, असा इशारा मोरे यांनी दिला.
कारखानदार भावाबाबत बोलायला तयार नाहीत.
कोल्हापुर जिल्ह्यातील दर व पश्‍चिम महाराष्ट्रातील दरात जर 1000 रूपयांचा फरक पडतो तरी ही तफावत थांबविली पाहीजे,असे त्यांनी सांगीतले. यापुढे कारखान्याला जाणारा ऊस थांबविणार, जिल्ह्यात ठिकठिकाणी, गावोगावी गाड्या आडविणार यामुळे आंदोलनाला हिसंक वळण लागू शकते. यासाठी कारखानदारांनी व प्रशासनाने ऊस दराबाबत लवकरच तोडगा काढावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष आंबादास कोरडे, रवींद्र मोरे, दिनेश वराळे, प्रकाश देठे, जितेंद्र भोसले, सुनील इंगळे, सुरेश ताके, अरूण डौले, विठ्ठल शेळके यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*