बॉलीवूडमध्ये झळकणार दुबईची बोल्ड अँड ब्युटीफुल ‘ओदिना’

0

मागील पंधरा वर्षांपासून दुबई मध्ये व्यवसायाने प्रोपर्टी डीलर म्हणून कार्यरत असणाऱ्या ओदिना नामक सुंदरी बॉलीवूड मध्ये एका हिंदी फिल्मद्वारे आगमन करीत असून आदर्श जैन फिल्म्स अँड सन ऑडीओ प्रायव्हेट लिमिटेड द्वारा तसेच निर्माती यामिनी जैन आणि निर्देशक आदर्श जैन यांच्या हिंदी चित्रपट ‘फ़ास्ट ट्रेक’ द्वारे रुपेरी पडद्यावर आपला जलवा दाखविणार आहे.

ओदिना व्यवसायाने एक प्रोपर्टी डीलर म्हणून कार्यरत असली तरी तिला गायन, नृत्य आणि मॉडेलिंग ची नितांत आवड असल्याचे समजते.एवढेच नाही तर काही जवळच्या मित्र मंडळीना तिने गायन आणि नृत्याचे धडे दिले आहेत.

आपल्या बॉलीवूड प्रवेशा बद्दल ओदिना ने सांगितले की, एकदा एका नियोजित कार्यक्रमा च्या प्रसंगी माझी आदर्श जैन यांच्या शी भेट झाली.योगायोगाने त्यांची त्या वेळेस त्यांच्या आगामी फिल्म साठी अभिनेत्रीच्या शिध मोहीम चालू होती.विदेशी आणि अस्साखलीत इंग्रजी बोलणाऱ्या अभिनेत्री ची गरज आदर्श यांना होती.आमच्या मध्ये प्राथमिक बोलणे झाले आणि त्यांनी मला त्यांच्या आगामी फिल्म साठी संधी दिली.

‘फ़ास्ट ट्रेक’ मध्ये मी ओदिना,याच नावाची भूमिका करीत असून ती दुबईत स्थायिक असते. कामानिमित ती दुबई हून भारतात येते, त्या नंतर काही अनपेक्षित घटनांचा सिलसिला सुरु होतो अन एक नाट्यमय घडामोडींना सुरुवात होते.

आदर्श जैन यांनी या अगोदर मिथुन चक्रवर्ती अभिनित“बेंगॉल टायगर”चे दिग्दर्शन केले आहे.आता ‘फ़ास्ट ट्रेक’ चे दिग्दर्शन करणाऱ्या आदर्श जैन यांनी सांगितले की, ही एक संगीतमय अक्शन फिल्म असून फिल्म चे चित्रीकरण संपूर्णपणे नैनिताल येथे होणार आहे.

येत्या 25 जून पासून चित्रीकरणास प्रारंभ होईल.सध्या गाण्यांचे रेकोर्डिंग सुरु झाले आहे.यामध्ये एकूण पाच अभिनेते आणि पाच अभिनेत्री असून मध्यवर्ती भूमिकेत ओदिना च असेल.मला अपेक्षित असलेली मुख्य नायिका मनासारखी आणि पटकथेची जशी गरज आहे अगदी तशीच मिळाली आहे.फिल्म मध्ये एकूण पाच गाणी आहेत.

LEAVE A REPLY

*