कुख्यात दरोडेखोर जेरबंद

पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा
 कुख्यात दरोडेखोर जेरबंद

पुणे (प्रतिनिधी) - पुणे ग्रामीण, रायगड, अहमदनगर येथील पोलिसांना मागील पाच वर्षांपासून गुंगारा देणारा कुख्यात रमेश पडवळ टोळीतील अट्टल दरोडेखोर अजय उर्फ आज्या उर्फ अजित अशोक शिंदे (वय 25, रा. निमगाव दावडी,ता. खेद, जि. पुणे) हा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. A

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अट्टल दरोडेखोर आज्या शिंदे हा खेडमधील पाराडीयेथील डोंगरामध्ये निर्जन काटेरी वनामध्ये लपून छपून आपल्या कुटुंबासह वास्तव्य करीत असल्याची माहिते पोलीस कर्मचारी फारूक मुल्ला व नितीन बहिरट यांन मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक पथक आरोपीच्या मार्गावर रवाना केले. त्यानंतर पोलिसांनी सप्ला रचून शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता तो पुण्यातील खेद तालुक्यातील कुख्यात दरोडेखोर रमेश बाळू पडवळ याच्या टोळीचा सदस्य आहे. तसेच त्याच्या टोळीने महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर, रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी दरोडे घातले असल्याचे सांगितले.

तळेगाव दाभाडे, खालापूर, मंचर, रांजणगाव, शिरूर, पारनेर, खेद, कोतवाली पोलीस ठ्ण्यातील गंभीर 1 गुन्ह्यात तो फरार आरोपी आहे. गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन आपले अस्तित्व लपवून पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी राहत होता. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने त्याला शिताफीने अटक केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com