मोठ्याचा खून करून लहान  भाऊ पोलीस ठाण्यात हजर
DT Crime Watch

मोठ्याचा खून करून लहान भाऊ पोलीस ठाण्यात हजर

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार । प्रतिनिधी

नंदुरबार येथील महालक्ष्मीनगर हमालवाडा परीसरात राहणार्‍या युवकाने आजारपणाला कंटाळुन स्वतःहाला मारण्याचा प्रयत्न केला.त्यात अपयश आल्याने लहान भावास मारण्यास सांगीतल्याने लहान भावाने मोठ्या भावाचा दगडाने ठेचुन खुन केल्याची घटना घडली आहे.या घटनेचे वृत्त शहरात पसरताच एकच खळबळ उडाली.खुना नंतर लहान भाऊ  स्वतःहा पोलीस ठाण्यात हजर झाला व त्यानेच फिर्याद नोदंविली.याप्रकरणी त्याच्या विरूध्द पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शहरातील हमालवाडा परिसरात राहणार्‍या प्रकाश भटू पाटील (35) याला दारूचे व्यसन होते. त्यातुन तो आजारी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्नालयात दि.4 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आल होते.

आज दि.8 रोजा सकाळी 7 वाजेच्या सुमारास प्रकाश पाटील यांनी त्याचा लहान भाऊ राहुल पाटील याला सोबत घेवुन नंदुरबार साक्री रस्त्यावरीत हॉटेल राजपुताना जवळील कृषी केेंद्राच्या पाठीमागील शेतातील कोपर्‍यात नेले.त्याठिकाणी प्रकाश पाटील याने स्वतःहाला मरण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला यश न आल्याने त्याने संशयीत आरोपी लहानभाऊ  राहुल पाटील याला ठार मारण्यास सांगितले. राहुल पाटील याने प्रकाश पाटील याच्या डोक्यात दगडाचे तीन वार घातले. यात प्रकाश भटु पाटील (35) रा.महालक्ष्मीनगर हमालवाडा (नंदुरबार) याचा मृत्यू झाला.

त्यानंतर दुपारी 12.10 च्या दरम्यान संशयीत आरोपी राहुल भटु पाटील रा.महालक्ष्मीनगर हमालवाडा (नंदुरबार) हा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात हजर झाला व त्याने घडलेली हकीगत सांगत मोठया भावाचा सांगण्यावरून त्याचा खून केल्याची फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात राहुल पाटील विरूध्द भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीसांनी अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सपोनि एस.आर. दिवटे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com