जळगाव : वादग्रस्त पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव : वादग्रस्त पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव-

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा आक्षेपार्ह संदेश ट्विटरवरुन व्हायरल केल्याप्रकरणी विनायक अशोक कोळी उर्फ विक्की कोळी ( रा. सत्यम पार्क , दूध फेडरेशन परिसर) या तरुणाविरुद्ध रविवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अंगत नेमाने यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण निकम यांना विक्की कोळी या तरुणाने त्याच्या ट्विटर अकाउंट वरुन धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकल्याची माहिती दिली. अरुण निकम यांनी तत्काळ त्या तरुणाच्या शोधार्थ तत्काळ पोलीस नाईक मनोज पाटील, गणेश पाटील या कर्मचार्‍यांना रवाना केले. पोलिसांनी विक्री यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्या मोबाइलची तपासणी केली असता ४ एप्रिल रोजी दुपारी ३.२१ वाजता त्याने ट्विटरवरुन आक्षेपार्ह संदेशाची पोस्ट टाकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्या विरुद्ध मनोज पाटील या पोलीस कर्मचार्‍याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या आदेशाने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सायबर विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. त्यानुसार ट्विटर संबंधित पहिलाच गुन्हा जळगाव शहरात दाखल झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com